घरCORONA UPDATEनेपाळच्या मशिदीत लपले २४ तबलीगी, अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं

नेपाळच्या मशिदीत लपले २४ तबलीगी, अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं

Subscribe

भारतीय सीमेच्या जवळ नेपाळमधील एका मशिदीत लपून बसले होते. त्यानंतर संधी मिळताच भारतात प्रवेश करण्याच्या विचारात होते.

भारतातील जालीम अन्सारी संदर्भात बातम्या समोर आल्यानंतर नेपाळ पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. नेपाळच्या पर्सा जिल्हा प्रशासन आणि नेपाळ पोलिसांच्या पथकाने मशिदीत लपून बसलेल्या २४ भारतीय तबलीग जमातीच्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. तीघांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत. त्यानंतर या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. सुरुवातीला स्थानिक प्रयोगशाळेत त्यांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर दुसरी चाचणी घेण्यासाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने काठमांडूला पाठवण्यात आले आहेत. जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर कोरोना झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीनहून परतलेले हे सर्व जण भारतीय सीमेच्या जवळ नेपाळमधील एका मशिदीत लपून बसले होते. त्यानंतर संधी मिळताच भारतात प्रवेश करण्याच्या विचारात होते. हे सर्व जालीम मियांच्या सांगण्यावरून त्या मशिदीत लपले होते. दरम्यान, मशिदीतून ताब्यात घेतलेल्या २४ जणांपैकी ३ जणांना कोरोना संशयित म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर उर्वरित लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण बिरगंज शहरात लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. आजतक या वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हृदयद्रावक: नवजात बालकाच्या मृत्यूनंतर पत्नीलाही भेटला नाही, पोलीस कर्तव्यावर परत


भारतात तबलीग जमातीची बातमी समोर आल्यानंतर नेपाळमधील बर्‍याच मशिदी आणि मदरशांमध्ये छापे टाकण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि बीरगंज महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक घरात आणि खेड्यांमध्ये शोध घेण्याची जबाबदारी नेपाळी सैन्याकडे सोपवली आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. मात्र, त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -