घरCORONA UPDATEबंगळुरुमध्ये लहानग्यांना कोरोनाची बाधा, कर्नाटक सरकारची धावपळ

बंगळुरुमध्ये लहानग्यांना कोरोनाची बाधा, कर्नाटक सरकारची धावपळ

Subscribe

बंगळूरुमध्ये शाळा सुरू करण्यात आल्यानंतर ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या १० दिवसात शाळांमधील एकूण ५४३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आसल्याचे समोर आले होते.

बंगळुरुमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. बंगळुरुत काही दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या असून शाळांमध्ये देखील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळत आहेत. बंगळूरमध्ये गेल्या ५ दिवसांमध्ये जवळपास २४२ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. लहान मुलांमध्ये आढळणारी कोरोना रुग्णसंख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची चांगलीच धावपळ उडाली आहे. (242 children corona positive in last five days in Bangalore, Karnataka government rush)

बंगळूरुमध्ये शाळा सुरू करण्यात आल्यानंतर ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या १० दिवसात शाळांमधील एकूण ५४३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आसल्याचे समोर आले होते. यात २७० मुली आणि २७३ मुलगे होते. बंगळूरु महापालिकेच्या म्हणण्यानुसार, एकूण ५०२ विद्यार्थ्यांना स्पर्शाद्वारे कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी कर्नाटक सरकार लहान मुलांचे परिक्षण करणार आहे. कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या आणि सह आजार असलेल्या मुलांची वेगळी यादी तयार करण्यात येईल. अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना पौष्टिक आणि पूरक आहार देण्याची योजना त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेण्यात येईल, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य आणि चिकित्सामंत्री डॉ. के सुधाकर यांनी बुधवारी बंगळुरुमधील ग्रामीण ठिकाणच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यासंबंधी एक बैठक घेतली. ग्रामीण भागातील रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या मुलांना यादी तयार करुन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करा असे सांगितले आहे.

- Advertisement -

बंगळुरुच्या महापालिकेने बंगळुरुमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकरणाविषयी न घाबरण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संक्रमित झालेल्या नागरिकांना त्वरित रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


हेही वाचा – लसीचे दोन्ही डोस घेऊनही होतोय डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग; ICMR चा मोठा खुलासा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -