घरदेश-विदेश२५ जुलै आहे स्पेशल, का ते जाणून घ्या

२५ जुलै आहे स्पेशल, का ते जाणून घ्या

Subscribe

जगाच्या इतिहासात आजच्या दिवशी विज्ञानाशी संबंधित एका मोठ्या गोष्टीची नोंद झाली आहे. आजच टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. जगातील पहिला आयव्हीएफ अर्भक लुई ब्राऊनचा जन्म १९७८ मध्ये इंग्लंडच्या ओल्डहॅम येथे झाला होता. सुमारे अडीच किलोग्रॅम वजनाच्या लुईस ब्राऊनचा जन्म मध्यरात्रीनंतर सरकारी रुग्णालयात झाला.

ही प्रणाली जगभरातील नि: संतान जोडप्यांसाठी एक वरदान ठरली. लुईच्या जन्माची बातमी पसरताच एकट्या ब्रिटनमधील सुमारे ५००० जोडप्यांनी या नव्या प्रणालीद्वारे आपल्या मुलाची इच्छा व्यक्त केली. आज ही पद्धत भारतासह जगभरात प्रचलित आहे आणि दररोज हजारो महिला त्याद्वारे गर्भधारणा करतात.

- Advertisement -

आजच्या तारखेला देशाच्या इतिहासावर नोंदवलेल्या इतर महत्वाच्या घटना

१६८९ – फ्रान्सने इंग्लंडविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
१८१३ – भारतातील कोलकत्ता येथे प्रथम बोट रेस स्पर्धा आयोजित केली.
१८३७ – इलेक्ट्रिक टेलीग्राफच्या वापराचे प्रथम यशस्वी प्रात्यक्षिक पार पडलं.
१८५४ – वॉल्टर हंटला प्रथम पेपर शर्ट कॉलरसाठी यूएस पेटंट प्राप्त झाला.
१९४३ – इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांनी सत्ता सोडली, त्यानंतर किंग व्हिक्टर इमॅन्युएल यांनी मार्शल पिएत्रो बडोग्लियो यांना नवीन पंतप्रधान केलं.
१९४८ – ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे लक्ष्य गाठत भारतीय संघाविरुद्ध विक्रम नोंदविला.
१९६३ – अमेरिका, रशिया आणि ब्रिटन यांनी अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली.
१९७८ – जगातील पहिला आयव्हीएफ अर्भक लुई ब्राऊनचा जन्म इंग्लंडच्या ओल्डहॅम येथे झाला.
१९९४ – जॉर्डन आणि इस्रायलमधील ४६ वर्ष चालू असलेलं युद्ध संपलं.
२००० – एअर फ्रान्स कॉनकोर्डे विमान उड्डाण करताना हॉटेलवर कोसळलं. या अपघातात १०९ प्रवाश्यांव्यतिरिक्त हॉटेलमध्ये उपस्थित चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला.
२००७ – प्रतिभा पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -