घरताज्या घडामोडीयंदा प्रजासत्ताक दिनी परेड पाहण्यासाठी फक्त २५ हजार प्रेक्षकांना परवानगी

यंदा प्रजासत्ताक दिनी परेड पाहण्यासाठी फक्त २५ हजार प्रेक्षकांना परवानगी

Subscribe

यंदा प्रजासत्ताक दिवशी होणाऱ्या परेडला फटका बसला असून परेडची लांबी पाच किलोमीटरने घटवली आहे.

येणाऱ्या महिन्यातील २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवशी राजपथावर होणाऱ्या परेडला कोरोनामुळे फटका बसला आहे. दरवर्षी प्रमाणे परेड होणार नसून त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. नेहमी तब्बल ८.३ किलोमीटर लांबीचे परेड असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त ३.३ किलोमीटर म्हणजे विजय चौकापासून ते नॅशनल स्टेडियमपर्यंत परेड होणार आहे. तसेच यावेळेस परेडमध्ये सामील असलेल्या पथकांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत कमी असेल. याप्रमाणेच या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या देखील घटवण्यात आली आहे.

दरवर्षी नागरिकांमध्ये परेड पाहण्याची खूप उत्सुकता असते. संपूर्ण देशातील नागरिक परेड पाहण्यासाठी दिल्ली दाखल होतात. पण यावर्षी कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. यंदा प्रजासत्ताक दिवशी २५ हजार प्रेक्षकांना परेड पाहण्याची परवानगी सरकारने दिली आहे. सहसा दरवर्षी यादिवशी एक लाखांहून अधिक प्रेक्षक परेड पाहतात. दरम्यान नोव्हेंबरपासून दोन हजार सैनिक प्रजासत्ताक दिवस आणि सेना दिवससाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

येणाऱ्या प्रजासत्ताक दिवशी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात १५ वर्षापेक्षा कमी मुलांना प्रवेश दिला जाणार नाही आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यापूर्वी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि भारतीय संस्कृतीचे कौतुक केले होते. जेव्हा जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली होती. कोरोना विरोधात दोन्ही देश जोरदार लढत आहेत. ब्रिटनमध्ये फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजूर देण्यात आली आहे. पण अद्याप भारतात कोरोना लसीला मंजूरी दिली नसून सध्या सरकारमध्ये चर्चा सुरू आहे.


हेही वाचा – येमेनचं सरकार विमानतळावर पोहचताच बॉम्बस्फोट; २० ठार, ५० हून अधिक जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -