घरदेश-विदेशगुजरातमध्ये २५ होमगार्ड महिलांवर लैंगिक अत्याचार

गुजरातमध्ये २५ होमगार्ड महिलांवर लैंगिक अत्याचार

Subscribe

गुजरातमध्ये २५ महिला होमगार्डचं लैंगिक शोषण केलं जात असल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घतल्यानं त्याचं गांभीर्य आता आणखीन वाढलं आहे.

गुजरातमध्ये २५ होमगार्ड महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार आणि लैंगिक छळ  होत असल्याचं या महिलांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तसेच काही महिलांकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब देखील आता समोर आली आहे. शुक्रवारी दोन महिलांनी यासंदर्भातील तक्रार पोलिस आयुक्त सतीश शर्मा यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिस आयुक्तांनी दिली. २ महिला होमगार्डनं केलेल्या लेखी तक्रारीमध्ये मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि शरीर सुखाची मागणी केल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राज्यमंत्र्यांना देखील हे ४ पानी तक्रार पत्र पाठवण्यात आलं आहे. शिवाय, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानींकडे देखील लैंगिक अत्यारासंदर्भातील पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य आता आणखीन वाढलं आहे. तर, काही अधिकाऱ्यांनी अपेक्षित ठिकाणी बदली हवी असल्यास पैशांची देखील मागणी केली आहे. तसेच पैसे न दिल्यास महिलांची बदली ही खूप लांब केली जात असल्याचं देखील या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तर, काही महिलांना घरकामासाठी देखील राबवलं जात असल्याची बाब आता समोर आली आहे. या साऱ्या प्रकरणामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेल्याचं आयुक्त सतीश शर्मा यांनी म्हटलं आहे. हे सारं प्रकरण पोलिस खात्याशी संबंधित नसून त्यावर अंतर्गत समितीमार्फत चौकशी केली जाईल. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं देखील आयुक्तांनी सांगितलं. पण, होमगार्ड महिलांनी केलेल्या तक्रारीवरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -