Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बापरे! मोरोक्कोमध्ये २५ वर्षीय महिलेने दिला ९ बाळांना जन्म; डॉक्टर हैराण

बापरे! मोरोक्कोमध्ये २५ वर्षीय महिलेने दिला ९ बाळांना जन्म; डॉक्टर हैराण

Related Story

- Advertisement -

एखाद्या महिलेला जुळं किंवा तिळं होणं हे काही नवीन नाही. मात्र मोरक्को येथे राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना जन्म दिल्याने सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहे. या महिलेने दिलेल्या ९ बाळांच्या जन्मानंतर डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.

मोरोक्कोमध्ये राहणारी २५ वर्षीय हलिमा सिसे हिने मोरोक्कोमध्ये नऊ बाळांना जन्म दिला. या घटनेने डॉक्टर देखील चकित झाले आहे. मालीमध्ये हलिमाचा अल्ट्रासाऊंड करण्यात आले तेव्हा गर्भात केवळ ७ बाळ असल्याचे नोंद करण्यात आले होती. मात्र या महिलेच्या प्रसूतीच्या वेळी तिने ९ बाळाना जन्म दिला. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असा घडला प्रकार

- Advertisement -

पश्चिम आफ्रिका देशातील माली सरकारने असा दावा केला आहे की, एका महिलेने एकाच वेळी ९ मुलांना जन्म दिला आहे. त्या महिलेला चांगल्या उपचारासाठी मोरोक्को येथे आणण्यात आले होते. मात्र मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या घटनेची खातरजमा केली नाही. एका महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म देणं ही फार दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे तर सध्या या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. मालीचे आरोग्यमंत्री फंता सिबी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नवजात मुलांमध्ये हलिमाने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला आहे आणि आईसह सर्व मुले सुखरूप असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -