Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कौतुकास्पद! कोरोनावर मात करून २५ वर्षीय व्यक्तीने गाठले एव्हरेस्ट

कौतुकास्पद! कोरोनावर मात करून २५ वर्षीय व्यक्तीने गाठले एव्हरेस्ट

Related Story

- Advertisement -

असे म्हणतात की ”मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है,” ही वाक्यप्रचार वसई येथील रहिवासी २५ वर्षीय हर्षवर्धन जोशी या तरूणाने सत्यात उतरवलं आहे. खरं तर हर्षवर्धन या तरूणाने कोरोनावर मात करून माउंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई पूर्ण केली आहे. ही कौतुकास्पद कामगिरी करून त्याने लोकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. हर्षवर्धन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे हे एव्हरेस्ट मिशन अत्यंत कठीण आणि संघर्षाने भरलेले होते. यासह त्याने असेही म्हटले की, एकीकडे डोंगराचे सुंदर दृश्य आणि हृदयस्पर्शी वातावरण होते तर दुसरीकडे कॅम्पमध्ये प्रवेश केलेल्या कोरोनाने सर्वांना घाबरवले होते.

प्रत्येकाने महामारी रोगाबद्दल सावधगिरी बाळगली होती आणि प्रवास सर्व नियमात सुरू होता, परंतु असे असताना त्याच्या टीममधील काही सदस्य कोविड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या कॅम्प कोविडने कसा प्रवेश केला हे अद्याप सांगण्यात आले नाही. दरम्यान कोविडची लागण झाल्यामुळे, बेस कॅम्पमध्ये संघ एकमेकांपासून अंतर ठेवून होते. हर्षवर्धन आणि त्याच्या साथीदारांवर डॉक्टरांच्या पत्नीने काही रॅपिड-एंटीजनचाचणी किट्सच्या सहाय्याने कॅम्पमध्ये उपचार केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshvardhan Joshi (@travelwithharsh)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी हर्षवर्धन यांना परत जाण्याचा सल्ला यांना दिला होता, परंतु त्यांनी ही चढाई पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मी निष्काळजी किंवा बेजबाबदार राहणार नाही, असे त्याने सांगितले होते, परंतु त्यांना त्वरित परत जाण्याची इच्छा नव्हती असे जोशी यांनी सांगितले. हर्षवर्धन याच्या मते, जेव्हा अनेक संघर्षानंतर जेव्हा त्याने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले आणि ध्वज फडकविला तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला. त्याने सांगितले की ‘मी खूप आनंदी होतो परंतु मी विचार करीत होतो की हा प्रवास केवळ ५० टक्के आहे, बरेच लोक असे मानतात की शिखर चढणे हे सर्व काही आहे, परंतु खाली उतरणे अधिक धोकादायक आहे’.

- Advertisement -

 

 

- Advertisement -