घरताज्या घडामोडी'या' राज्याला शाळा सुरू करणं पडलं महाग! २६२ विद्यार्थी आणि १६० शिक्षक...

‘या’ राज्याला शाळा सुरू करणं पडलं महाग! २६२ विद्यार्थी आणि १६० शिक्षक झाले कोरोनाबाधित!

Subscribe

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील तितकेच वाढताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना हळूहळू नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्यामुळे अनेक राज्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. पण आंध्र प्रदेशला हेच महागात पडले आहे. आंध प्रदेश मधील सरकारने नववी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी २ नोव्हेंबर पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू होता तीन दिवसांत २६२ विद्यार्थी आणि १६० शिक्षक कोरोनाबाधित आढळले. शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्रुदू यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, ‘शाळेत येणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत लागण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा चिंताजनक नाही आहे. प्रत्येक संस्थेमध्ये कोरोनाच्या सुरक्षा संबंधित नियमांचा पालन करण्यासाठी सर्व प्रकारची शक्य तितकी पाऊल उचलली जात आहेत. ४ नोव्हेंबरला सुमारे ४ लाख विद्यार्थी शाळेत पोहोचले. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २८२ आहे. जे ४ लाख विद्यार्थ्यांच्या तुलनेत ०.१ टक्के देखील नाही आहे. त्यामुळे शाळेत गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा कोरोनाची लागण झाली आहे, असे सांगणे योग्य नाही.’

- Advertisement -

‘प्रत्येक वर्गात फक्त १५ किंवा १६ विद्यार्थी उपस्थित राहत आहे, हे आम्ही सुनिश्चित केले आहे. ही चिंतेची बाब नाही आहे. विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यामध्ये नववी आणि दहावीच्या वर्गात ९.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३.९३ लाख विद्यार्थी शाळेत आले होते. तसेच एकूण १.११ लाख शिक्षकांपैकी ९९ हजारांहून अधिक शिक्षकांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले. १.११ लाख शिक्षकांपैकी जवळपास १६० शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे’, असे चिन्ना वीरभद्रुदू म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ‘गरीब विद्यार्थ्यांवर शाळा बंद असल्यामुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे. कारण ऑनलाईन वर्ग त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शाळा बंद ठेवण्याचा परिणाम आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर पडले. कारण शिक्षण थांबविल्यानंतर पालक त्यांच्या बाल विवाह करू शकतात.’

- Advertisement -

हेही वाचा – प्रदूषणाने दिल्लीचं झालं गॅस चेंबर; दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -