Corona In India: देशात रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम! २४ तासांत २,६८,८३३ नव्या रुग्णांची भर, पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर

देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

omicron variant infection rate slow down in uk canada italy ireland denmark india will take time
Omicron Variant: 'या' सहा देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या घटली; भारतात रुग्णसंख्या केव्हा घटणार?

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. काल, शुक्रवारी देशात २ लाख ६४ हजार २०२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज, शनिवारी यामध्ये ४ हजार ६३१ रुग्णांची भर पडून २४ तासांत २ लाख ६८ हजार ८३३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे देशातील पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच २४ तासांत ४०२ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण बरे होऊन घरी आहेत. सध्या देशात १४ लाख १७ हजार ८२० सक्रीय रुग्ण आहेत. तसेच देशात आतापर्यंत ६ हजारांहून अधिक ओमिक्रॉन रुग्णांची संख्या गेली आहे. एकाबाजूला कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत असून दुसऱ्याबाजूला ओमिक्रॉनचा धोका देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ६८ लाख ५० हजार ९६२
एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ८५ हजार ७५२
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ३ कोटी ४९ लाख ४७ हजार ३९०
एकूण सक्रीय रुग्णसंख्या – १४ लाख १७ हजार ८२०
एकूण ओमिक्रॉनची रुग्णसंख्या – ६ हजार ४१

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १ अब्ज ५६ कोटी २ लाख ५१ हजार ११७ कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात ५८ लाख २ हजार ९७५ डोस देण्यात आले होते.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनावर मात करण्याचे हत्यार मिळाले भांग, गांज्यात?; पण वैज्ञानिक म्हणाले…