घरदेश-विदेशवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, ओबीसींना २७ टक्के, तर EWS कोट्यातील विद्यार्थ्यांना १०...

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, ओबीसींना २७ टक्के, तर EWS कोट्यातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण

Subscribe

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकाराने एक महत्त्पपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यात इतर मागासवर्गीय (OBS) आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातील विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून वैद्यकीय/दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात (MBBS / MD / MS / डिप्लोमा / BDS / MDS) प्रवेश घेणाऱ्या OBC कोट्यातील २७ टक्के आणि EWS कोट्यातील  १० टक्के विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. अखिल भारतीय कोटा योजनेअंतर्गत (AIQ) ओबीसी आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी या आरक्षणाचा फायदा घेता़ येणार आहे. ही योजना २०२१-२२ च्या सत्रापासून सुरु होईल.

- Advertisement -

राज्यातील जवळपास  ५ हजार ५०० विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे. यात दरवर्षी ओबीसी कोट्यातून MBBS मध्ये प्रवेश घेणाऱ्या १५०० आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या २५०० विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर ईडब्ल्यूएस कोट्यातून MBBS मध्ये प्रवेश घेणाऱ्या ५५० आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना दरवर्षी या आरक्षणाचा फायदा होईल. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण जागांपैकी UG (पदवीधर) १५ टक्के आणि PG (पदव्युत्तर) ५० जागा अखिल भारतीय कोट्याअंतर्गत येतात.

इतर मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याची सुचना केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केली होती. यानंतर हे आरक्षण लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. अखिल भारतीय कोट्यातून ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी बऱ्याच सुरु होती. त्यामुळे २६ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी यावर लवकरात लवकर समाधानकारक उपाय शोधण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र आज अखरे या आरक्षणावर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

एनडीएच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) खासदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी अखिल भारतीय शिक्षण कोट्याअंतर्गत ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण लागू करण्याची मागणीही त्यांनी केली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -