घरCORONA UPDATEcorona virus : धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात २७० डॉक्टरांचा मृत्यू, IMA...

corona virus : धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात २७० डॉक्टरांचा मृत्यू, IMA ची माहिती

Subscribe

बिहारमध्ये आत्तापर्यंत ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

देशात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला असून आरोग्य यंत्रणा मेटाकुटीस आली आहे. अनेक रुग्णांनी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, औषधांअभावी प्राण गमावले आहेत. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टरांनीही आपला जीव गमावला आहे. यांसंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने मंगळवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील २७० डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे स्पष्ट केले. आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दररोज हजारो कोरोनाबाधित मृतांची नोंद केली जात आहे. परंतु अनेक अहवालांमध्ये सरकारवर असा आरोप केला जात आहे की सरकार फक्त गंभीर कोरोना मृतांचा नोंदणी करत आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये फक्त ३.४ डॉक्टरांचीच नोंदणी आहे. त्यामुळे देशातील १२ लाखाहून अधिक असलेल्या डॉक्टरांची नोंद अद्याप झालेली नाही. त्यामुळे नोंदणी नसलेल्या कोरोनाबाधित मृत डॉक्टरांची संख्याही देशात अधिक असून शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २७० डॉक्टरांमध्ये देशातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. के.के अग्रवाल यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या गंभीर संसर्गाशी झुंज देताना अखेर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. यावर बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे.ए.जयालाल सांगतात की, कोरोना संसर्गाची दुसरी लाट सर्वांसाठीच घातक आहे. विशेषत: आरोग्य सेवेत आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे.

दरम्यान आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वाधिक कोरोनाबाधित मृतांची नोंद एकट्या बिहार राज्यात झाली आहे. बिहारमध्ये आत्तापर्यंत ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशात ३७, दिल्लीत २९ तर आंध्रप्रदेशात २२ आरोग्य सेवकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात ५० मृत्यूची नोंद एकट्या रविवारी झाली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत भारतातील आरोग्य सेवा कामगारांपैकी केवळ ६६ टक्के कामगारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टरांपैकी केवळ ३ टक्के डॉक्टरांनीच कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. यावर बोलतानी IMS चे सरचिटणीस डॉ. जयेश लेले सांगतात, इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व डॉक्टरांना लसी देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. अनेकदा डॉक्टरांना विश्रांती न घेता ४८ तास ताणतणावात काम करावे लागत आहे. यामुळे अनेक डॉक्टरांनी कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण होत आहे. तर अनेक डॉक्टरांचा संसर्गदरम्यान मृत्यू होत आहे. त्यामुळे केंद्र सरकाराने आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य उपाययोजन करण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.


कंपनीला पोस्टाने पाठवला लॅपटॉप, पोहचले नवरत्न तेल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -