Live update: इराणने भारताला ३०० ऑक्सिजन कंसंट्रेटरची केली मदत

corona monkeypox Vice PresidentJagdeep Dhankhar cm eknath shinde monsoon update raksha bandhan 2022

इराणने भारताला ३०० ऑक्सिजन कंसंट्रेटर दान केले असून ते नवीन दिल्लीत पोहोचले आहेत.


काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर मधील मोहिनी पॅलेस या इमारतीचा स्लॅप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा कॅम्प नंबर 2 येथील साई शक्ती या इमारतीचा स्लॅप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.


गोव्यात २४ तासांत १ हजार ५५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ३९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबईत गेल्या २४ तासांत ९२९ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


दिल्ली गेल्या २४ तासांत १ हजार १४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ७९९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख २३ हजार ६९०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २३ हजार ९५१ जणांचा मृत्यू झाला असून १३ लाख ८५ हजार १५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १४ हजार ५८१ सक्रीय रुग्ण आहेत.


मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे. या भेटीदरम्या मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित आहेत.


१० वीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम, १० वीच्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाद्वारे उत्तीर्ण करणार, गृहपाठ तोंडी परीक्षेला २० गुण, लेखी मूल्यमापणास ३० गुण, नववीच्या निकालावर आधारीत ५० गुण,  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड पत्रकारांशी आज १.१५ वा संवाद साधणार आहेत. शासकीय निवासस्थान ही पत्रकार परिषद होणार आहे.


सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक


दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट, तर मृतांचा आकडा ३,६६० वर


बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडी चौकशी, हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील जमीन लाटल्याचा आरोप


पालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराची माघार, इतर ७ कंपन्यांकडून कागदपत्रं नाहीत


कोरोनावरील औषधे आणि व्हॅक्सीनवरील कर होणार माफ? आज GSTकाउंसिलची महत्त्वपूर्ण बैठकी