तीन दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू; सर्वात कमी वयाच्या मृत्यूची नोंद

four month abandoned girl child found in pune police registered complaint against unknown women
धक्कदायक! चार महिन्याच्या गोंडस मुलीला झाडाखाली ठेवले आणि...

भारताचा केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये रविवारी एका तीन दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी झालेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. मृत्यू झाल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. चंदीगडमधील एकूण कोरोनाच्या मृत्यूची संख्या चार वर पोहोचली आहे. बाळाच्या आईची मात्र अजूनही कोरोना चाचणी झालेली नव्हती. बाळाच्या मृत्यूनंतर ती चाचणी घेण्यात आली, मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

चंदीगडमध्ये रविवारी २९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये एक सहा वर्षांची मुलगी आणि १२ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. चंदीगडच्या बापूधाम कॉलनीमधून सर्वाधिक केसेस समोर आल्या आहेत. या कॉलनीत शनिवारी १४ रुग्ण आढळले होते. चंदीगडची एकूण रुग्णसंख्या आता २६२ वर पोहोचली असून यापैकी ७२ केसेस अॅक्टिव्ह आहेत.

रविवारी आढळलेल्या २९ रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील ३० आणि ३७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर १८ वर्षांचा एक मुलगा आणि २३ वर्षांच्या महिलेचा समूह संसर्गामुळे कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ३ कुटुंबातील ६ पुरुषांनाही रविवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. हे सर्व रुग्ण १४ ते ५६ वयोगटातील आहेत.

रविवारी आढळलेल्या एकाही रुग्णाला विशेष कोविड १९ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलेले नाही. PGIMER हे विशेष कोविड हॉस्पिटल मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. नवीन आढळणारे रुग्ण हे सेक्टर ४६ मधील GMSH -16, GMCH – 32 आणि धन्वंतरी आर्युवेदा कॉलेजमध्ये दाखल करण्यात येतात. सध्या PGIMER या विशेष कोविड रुग्णालयात केवळ चार रुग्ण ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी ७५ वर्षीय रुग्णाची तब्येत नाजूक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.