घर देश-विदेश जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 3 जवान शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात आज बुधवारी (ता. 13 सप्टेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन लष्करी अधिकारी आणि डीएसपी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात आज बुधवारी (ता. 13 सप्टेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन लष्करी अधिकारी आणि डीएसपी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती देताना एका लष्कर अधिकाऱ्याने सांगितले की, आज सकाळी एका ठिकाणी आतंकवादी दिसल्याची माहिती मिळााली होती. त्यानंतर भारतीय सैन्याकडून या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला. आतंकवादी लपलेले असल्याचे ठिकाण कळाल्यानंतर त्यांच्यासोबत चकमक सुरू झाली. कर्नल मनप्रीत सिंग यांनी सैन्याचे नेतृत्व करत दहशतवाद्यांवर हल्ला केला. यामध्ये दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते या चकमकीत शहीद झाले. तसेच, या घटनेत मेजर आशिष धोनक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. (3 jawans martyred in an encounter with terrorists in Jammu and Kashmir)

हेही वाचा – भोपाळमध्ये INDIA आघाडीची ऑक्टोबरमध्ये पहिली जाहीर सभा; आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचार्‍यांचे पथक अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळालेल्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी पोहोचले, पण जसे ते दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचले, त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान लष्कराचे कर्नल जागीच शहीद झाले. तर अन्य दोन अधिकारी गोळ्या लागल्याने जखमी झाले. त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यामुळे दोन्ही अधिकारी शहीद झाले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, इनपुटनुसार दहशतवाद्यांचा गट लष्कर/टीआरएफ गटाचा होता.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. जम्मू-काश्मीरमधून ही अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण काश्मीरमधील कोकरनाग भागात आज झालेल्या चकमकीत लष्करातील एक कर्नल, एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या डीएसपीने सर्वोच्च बलिदान दिले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनैक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या प्रियजनांना या कठीण काळात शक्ती देवो, असे ट्वीट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

- Advertisement -

माजी जनरल व्हीके सिंग यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, भारतीय लष्कराचे पदक मिळालेले कर्नल मनप्रीत सिंग काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. या दु:खद बातमीने देश हादरला आहे. शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करत, या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळावे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

तर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट केले की, अनंतनागमधील चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना आमचे शूर सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या डीएसपीने सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्याच्या जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्या शूर सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनापासून संवेदना. भारत दहशतवादाविरोधात एकजूट आहे.

- Advertisment -