घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: वुहानचं सत्य बाहेर आणणारे ३ पत्रकार बेपत्ता

Coronavirus: वुहानचं सत्य बाहेर आणणारे ३ पत्रकार बेपत्ता

Subscribe

या लोकांच्या गायब होण्यावर कोणत्याही चिनी अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.

चीनने कोरोना विषाणूबद्दलची माहिती लपवल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देश चीनवर करत आहेत. वुहानमधील कोरोना येथे मृतांची संख्या कमी करुन सांगितल्याचा चीनवर आरोप आहे. दरम्यान, डेली मेलच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, वुहानचं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करणारे तीन पत्रकार जवळजवळ २ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हिसल ब्लोअर चेन किउशी, फॅंग ​​बिंग आणि ली जेहुआ यांचं बेपत्ता होणं गूढ रहस्य बनून राहिलं आहे. तिघेही वुहानमधील परिस्थितीवर रिपोर्टींग करत होते. त्यांना फेब्रुवारीपासून कोणीही पाहिलेलं नाही. त्याचवेळी या लोकांच्या गायब होण्यावर कोणत्याही चिनी अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.

या लोकांनी युट्यूब आणि ट्विटरवर व्हिडिओ अपलोड केले आहेत. तथापि, चीनमध्ये या दोन्ही माध्यमांवर अधिकृतपणे बंदी आहे. त्याच्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून आलं आहे की, वुहानच्या हॉस्पिटलमध्ये इतके रुग्ण आले होते की ती जागा कमी पडली आहे. ३४ वर्षीय चेन किउशीने शेवटची माहिती ६ फेब्रुवारी रोजी दिली होती. वुहानमधील लॉकडाऊनच्या काही दिवस आधी तो शहरात पोहोचल्याचं त्याने सांगितलं होतं. जगाला सत्य दाखवण्यासाठी तो वुहान येथे गेला होता. त्याचवेळी वुहानमध्ये राहणारा फॅंग ​​बिंगही ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. त्याने वुहानचे अनेक व्हिडिओही अपलोड केले आहेत. बसमध्ये मृतदेह भरले जात असल्याचा व्हिडिओही त्याने शेअर केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – चीनला नुकसान भरपाई करावीच लागेल; जर्मनीनं पाठवलं अब्जावधींचं बील


या तीन पत्रकारांपैकी ली जेहुआ सर्वात लहान आहेत. २५ वर्षीय ली हाय प्रोफाइल रिपोर्टर आहेत. त्यांनी चीनच्या सीसीटीव्ही मीडिया कंपनीत काम केलं होतं. नोकरी सोडल्यानंतर तो वुहानमधून स्वतंत्रपणे रिपोर्टिंग करत होता. असं म्हटलं जात आहे की २६ फेब्रुवारीपासून तो दिसलेला नाही.

- Advertisement -

रेडिओ फ्री एशियाच्या अहवालानुसार, बेपत्ता होण्याच्या काही काळाआधीच लि जेहुआने वुहानमधील अनेक संवेदनशील ठिकाणांना भेट दिली. यामध्ये स्मशानभूमीचा समावेश होता जिथे मृतदेह उचलण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -