घरक्राइमअमेरिकेत मॉलमध्ये हल्लेखोरांकडून अदाधुंद गोळीबार; तीन जणांचा जागीच मृत्यू

अमेरिकेत मॉलमध्ये हल्लेखोरांकडून अदाधुंद गोळीबार; तीन जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

अमेरिकेतील एका मॉलमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या अदाधुंद गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमेरिकेच्या ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये हा गोळीबार झाला.

अमेरिकेतील एका मॉलमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या अदाधुंद गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमेरिकेच्या ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये हा गोळीबार झाला. विशेष म्हणजे या गोळीबारानंतर एका नागरिकानेच हल्लेखोराला गोळी झाडून ठार केल्याचे समजते. (3 Killed In Us Mall Shooting Gunman Shot Dead By Armed Civilian)

अमेरिकेच्या इंडियानामधील मॉलमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्र बाळगणाऱ्या एका सामान्य नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला ठार केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात

या गोळीबारातील जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रीनवूड पोलीस विभागाचे प्रमुख जिम इसॉन यांनी दिली. तसेच, “पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सध्या कोणताही धोका नसल्याची माहिती मेयर मार्क यांनी एका परदेशी वृत्तवाहिनीला दिली आहे.

- Advertisement -

हल्लेखोराकडे एक मोठी रायफल

याशिवाय पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ६ वाजता मॉलमधील फूड कोर्टमध्ये गोळीबार होत असल्याचे फोन कॉल सेंटरमध्ये येऊ लागले होते. हल्लेखोराकडे एक मोठी रायफल होती. दरम्यान शस्त्रधारी एका सामान्य नागरिकाने गोळी घालून या हल्लेखोराला ठार केलं. या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता यासंबंधी पोलीस शोध घेत आहेत.

जुलैच्या पहिल्या आठवड्यातही गोळीबार

जुलैच्या पहिल्या आठवड्यातही इंडियानामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. इंडियानामधील गॅरी सिटीमध्ये एका पार्टीदरम्यान गोळीबार झाला होता. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. याशिवाय गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्येही गोळीबाराची घटना समोर आली होती, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आज भरणार उमेदवारी अर्ज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -