घरदेश-विदेशKupwara Encounter : पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या लष्कर -ए-तोय्यबाचे तीन दहशतवादी ठार

Kupwara Encounter : पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या लष्कर -ए-तोय्यबाचे तीन दहशतवादी ठार

Subscribe

सुरक्षा दलांनी तिन्ही दहशतवाद्यांना घेरत एकामागून एक तिघांना ठार केले. लष्कर-ए-तोय्यबाशी संबंधित हे दहशतवादी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेऊन काश्मीरमधील दहशतवादी घटनांना गती देण्यासाठी पाकिस्तानातून आले होते.

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद भडकावण्याचा पाकिस्तानकडून वारंवार प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यांचे प्रत्येक प्रयत्न भारतीय सुरक्षा दलाकडून हाणून पाडले आहेत. असाच प्रयत्न गुरुवारीही करण्यात आला. कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड गावातून पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या लष्कर- ए-तोय्यबाच्या तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले लष्कर ए- तोयब्बाचे तीन दहशतवादी स्थानिक नसून पाकिस्तानी नागरिक होते.

काश्मीरमध्ये दोन दिवसांत झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. आज कुपवाडामध्ये मारले गेले तीन दहशतवादी आणि बुधवारी बारामुल्ला चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे ठार झालेले तीन दहशतवादीही पाकिस्तानचे रहिवासी होते. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये आत्तापर्यंत 26 विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत. त्यात 14 जैश ए- मोहम्मद आणि 12 लष्कर ए- तोय्यबाचे आहेत. बारामुल्ला चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला.

- Advertisement -

ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही परंतु चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि गुन्हेगारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहेत. तीन असॉल्ट रायफल, 15 एके मॅगझिन, 344 काडतुसे, पाच ग्रेनेड, तीन आयईडी, अत्याधुनिक संवाद साधने आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

रात्रीच्या वेळी नियंत्रण रेषेला लागून असलेल्या जुमागुंड गावातून या दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. यावेळी गावातील काही लोकांना गावाबाहेर संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही वेळ न दवडता लष्कराच्या जवानांसह दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. एका ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. यात जवानांच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, सुरक्षा दलांनी तिन्ही दहशतवाद्यांना घेरत एकामागून एक तिघांना ठार केले. लष्कर-ए-तोय्यबाशी संबंधित हे दहशतवादी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेऊन काश्मीरमधील दहशतवादी घटनांना गती देण्यासाठी पाकिस्तानातून आले होते.


सरनाईक राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात, शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -