घरदेश-विदेशVistara: मुंबई-कोलकत्ता विमान उड्डाण करण्यापूर्वीच कोसळले, ८ जखमी; ३ प्रवासी अत्यंत गंभीर

Vistara: मुंबई-कोलकत्ता विमान उड्डाण करण्यापूर्वीच कोसळले, ८ जखमी; ३ प्रवासी अत्यंत गंभीर

Subscribe

मुंबईकडून कोलकत्याला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सचे विमान लँड होत असताना अचानक अपघात झाला. ही घटना सोमवारी घडली असून यामुळे आठ प्रवासी जखमी झाले, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एअरपोर्टचे संचालक सी. पट्टाभी यांनी वृत्तसंस्था ‘पीटीआय’ ला दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फ्लाइट यूके ७७५ कोलकत्ता विमानतळावर सुखरूप लँड झाले.

पट्टाभी यांनी असेही सांगितले, “विमान अपघात झाल्यामुळे विमानातील ३ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर अन्य ५ प्रवाशांना किरकोळ जखमी झाली आहेत.” किरकोळ जखमी झालेल्या ५ प्रवाशांना प्रथमोपचारानंतर त्यांच्या गंतव्यस्थानी पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या या विमानात १२३ प्रवासी होते, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

विमानतळ संचालकांनी सांगितले की, ही घटना खराब हवामान असल्याने झाली. तसेच सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा विमान कोलकत्यापासून २५ समुद्री मैलांवर होते. विस्ताराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रवाशांच्या दुर्दैवी या प्रसंगामुळे एअरलाइन्सकडून दु: ख व्यक्त करण्यात येत आहे आणि जखमींच्या आरोग्यावर बारीक लक्ष देखील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “आम्ही प्राधान्याने या घटनेचा तपास करीत आहोत आणि लवकरच या घटनेचे सविस्तर तपशील शेअर केला जाईल.”असे या घडलेल्या अपघातानंतर प्रवक्त्यांनी सांगितले.


शिक्षण, नोकरी, टोकयो ऑलिम्पिक निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रवास करताय ?

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -