श्रीनगरमध्ये पोलिसांवर ग्रेनेड हल्ला; ३ पोलीस जखमी

भारतीय जवानांनी गेल्या तीन ते चार दिवसामध्ये ५ जवानांचा खात्मा केला आहे. तसंच पाकिस्तांचे १२ बंकर देखील नष्ट केले आहे.

English Title - 3 persons injured after terrorists hurled grenade on security forces
पोलिसांवर ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांच्या टीमवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. श्रीनगरच्या झीरो ब्रिजजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ग्रेनेड हल्ल्यामध्ये तीन पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये दोन ट्राफिक पोलीस आहेत. जखमी पोलिसांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. दरम्यान, घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

एका दहशतवाद्याला अटक

तर, दुसरीकडे दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये जवानांनी लष्कर-ए-तोएबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. लष्कराकडून या दहशतवाद्याची चौकशी सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख मुबारक अहमद डार अशी सांगितली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावरुन, जवानांनी बुधवारी रात्री कुलगाम येथे घेरावबंदी करत या दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करणाऱ्या दहशतवाद्याची चौकशी सुरु असून त्याच्याकडून महत्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्याता आहे. तसंच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचे सांगितले जात आहे.

चकमकीत मेजर शहीद

दरम्यान, पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे त्याला भारतीय जवानांकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. भारतीय जवानांनी गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये पाकिस्तानच्या ५ रेजंर्सचा खात्मा केला आहे. तसंच पाकिस्तानचे १२ बंकर देखील नष्ट केले आहे. जवानांनी एलओसीजवळ पुंछ सेक्टर आणि राजौरी सेक्टरमध्ये फायरिंग करत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तर मंगळवारी कठुआ जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत एक मेजर शहीद झाले होते.

हेही वाचा – 

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्थान