Navratri 2021: बुर्ज खलिफा दुर्गा पूजा पंडाल विरोधात ३ पायलट्सनी केली तक्रार, लेझर शो करावा लागला बंद

लेझर लाईटमुळे विमानाच्या लँडिंगसाठी अडथळे येतात

pilots lodge complaint against Burj Khalifa Durga Puja Pandal in kolkata
Navratri 2021: बुर्ज खलिफा दुर्गा पूजा पंडाल विरोधात २ पायलट्सनी केली तक्रार, लेझर शो करावा लागला बंद

कोलकत्ताच्या सॉल्ट लेक सिटीच्या लेक टाऊन परिसरात असलेल्या दुबईच्या बुर्ज खलिफावर नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा पुजेची जय्यत तयारी करण्यात आली होती. दुर्गा पूजा पंडालसाठी बुर्ज खलिफावर ( Burj Khalifa Durga Puja Pandal)  लेझर लाईट शो आयोजित करण्यात आला होता.मात्र या लेझर लाईट शोमुळे कोलकत्ताची विमान वाहतूक सेवा ठप्प झाली. ३ वेगवेगळ्या पायलटने या संदर्भात कोलकत्ता एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बुर्ज खलिफावर सुरू असलेला लेझर लाईट शो बंद करावा लागला. पायलटच्या म्हणण्यानुसार, लेझर लाईटमुळे त्यांना विमान लँड करण्यात अडचणी येत होत्या. कोलकत्ता एअरपोर्ट अॅथोरिटीला याविषयीची माहिती दिल्यानंतर त्यांनी बुर्ज खलिफावरील लेझर लाईट शो बंद केला.


सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुर्गा पूजा पंडाळ हे अगदी जवळजवळ आहेत. दक्षिणी दमदमच्या श्रीभूमीवर विशाल दुर्गा पूजा मंडाल तयार करण्यात आले आहे. या पंडालवर बुर्ज खलिफा तयार करण्यात आला आहे. पंडालला आणखी आकर्षक करण्यासाठी तिथे लेझर शो आयोजित केला जातो. मात्र या लेझर लाईट शोमुळे सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानाच्या तीन पायलटने एटीसीकडे तक्रार केली आणि त्वरित यासंबंधी स्थानिक पोलिसांना सूचना देऊन लेझर लाईट शो थांबवण्यात आला.

कोलकत्ताचे पंडाल हे जगप्रसिद्ध आहे. त्याची इंची १४५ फुट उंच आहे. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या डिझाइननुसार तयार केलेल्या पंडालला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

अग्निशमन मंत्री सुजीत बोस यांनी पंडालच्या लेझर लाईटमुळे विमानांना येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. आम्ही टॉवरची उंची भारतीय विमान प्राधिकरणाच्या मर्यादा लक्षात घेऊनच तयार केले आहे,असे त्यांनी म्हटले. लेझर लाईटमुळे विमानाच्या लँडिंगसाठी अडथळे येतात त्यामुळे देशातील सर्व विमानतळांच्या आजूबाजूच्या परिसरात लेझर लाईट शो करण्यास परवानगी नाही.


हेही वाचा – Covid-19 Rules : १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान प्रवासावरील निर्बंध उठणार