Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Long COVID: कोरोना रिकव्हरीनंतर बर्‍याच दिवसांपर्यंत दिसतात 'ही' ३ लक्षणे

Long COVID: कोरोना रिकव्हरीनंतर बर्‍याच दिवसांपर्यंत दिसतात ‘ही’ ३ लक्षणे

Related Story

- Advertisement -

कोरोना संक्रमणादरम्यान, रुग्णाला विविध प्रकारची लक्षणे आढळतात. इतकेच नव्हे तर कोरोना रिकव्हरीनंतरही अशी काही लक्षणे आढळली आहेत, जे बर्‍याच दिवसांपासून रूग्णाला हैरान करत आहेत त्याला लाँग कोविड असे म्हणतात. ज्या लोकांना कोविडचा सौम्य किंवा मध्यम संसर्ग आहे त्यांना रिकव्हरीनंतर दोन आठवडे किंवा त्यापेक्षा कमी काळ ही समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. तर काही रुग्ण असे आहेत की ज्यांना १२ आठवड्यांपर्यंत ही लक्षणे जाणवत राहतात, याला लाँग कोविड असे म्हटले जाते.

कोरोना रिकव्हरीनंतरही रूग्णांमध्ये दिसतायंत हे लक्षणं

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनने केलेल्या नव्या अभ्यासानुसार, काही महिन्यांपूर्वी मध्यम किंवा गंभीर कोरोना संसर्ग झालेल्या ७० टक्के रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर वेगवेगळ्या लक्षणांचे अनुभव आले आहे. या संशोधनात असे सूचित करण्यात आले की, कोरोनातून बरे झाल्यावर बर्‍याच लोकांना लक्षणांनी सतत त्रास जाणवत आहे. जाणून घ्या या लक्षणांबद्दल…

थकवा

- Advertisement -

थकवा किंवा अशक्तपणा कोविड -१९ चे सामान्य लक्षण आहे. परंतु स्टॅनफोर्डच्या संशोधकांच्या मते, कोरोना महामारीने बरे झालेल्यांनाही हे लक्षण रूग्णांमध्ये जाणवत आहे. कोविड -१९ संसर्गामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते, ज्यामुळे एखाद्याला बराच काळ थकवा जाणवतो.

ब्रेन फॉग

ब्रेन फॉग हे एक असे लक्षण आहे जे कोविड संसर्गामध्ये अगदी सामान्य आहे. या लक्षणामुळे लोकांना एकाग्र होणं अत्यंत कठीण होते.

श्वास घेण्यास अडथळा

- Advertisement -

श्वास घेताना अडथळा जाणवणं हे कोविडचे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होऊन थकवा जाणवू शकतो. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळेवर उपचार न केल्यास छातीत दुखण्याची समस्या रूग्णाला जाणवू लागते.

- Advertisement -