कुलगाममध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश!

pulwama attacked : ammu jammuandkashmir encounter in tral pinglish village three terrorists eliminated operation still underway
प्रातिनिधिक फोटो

जम्मू- काश्मीरमधील कुलगाम भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आत्तापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्थनान घालण्यात जवानांना यश आलं आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जम्मू –काश्मीर पोलीस व लष्करी जवानांच्या पथककाडून ही कारवाई करण्यात येत आहे.

कुलगाममधील नागनाद-चिम्मर परिसरात चमकीस सुरूवात झाली आहे. या परिसरास जवानांनी वेढा दिला असून, शोधमोहीम राबवली जात आहे. या चकमकीत दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात जवानांना यश आले आहे.

उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये काल घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत जवानांनी एक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दहशतवाद्याकडून एक एके ४७ रायफल हस्तगत करण्यात आली होती.


हे ही वाचा – काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे – राघव चड्ढा