घरCORONA UPDATEजग कोरोनाची लस शोधतंय, भारत काय करतोय? वाचा!

जग कोरोनाची लस शोधतंय, भारत काय करतोय? वाचा!

Subscribe

जगभरात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत असताना जगभरातल्या संशोधन संस्था, तज्ज्ञ, वैज्ञानिक कोरोनावर मात करण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी लस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. WHOने दिलेल्या आकडेवारीनुसार आजघडीला जगभरातल्या तब्बल ८० संस्था कोरोनाला संपवण्यासाठीची लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जगभरातले वैज्ञानिक कोरोनाची लस शोधत असताना भारतात नेमकं काय घडतंय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर आता पंतप्रधानांचे मुख्य संशोधनविषयक सल्लागार के. विजय राघवन यांनी खुलासा केला आहे. भारतातल्या प्रयोगशाळांमध्ये नक्की काय घडतंय, याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.

भारतात रुग्णसंख्या दीड लाखांच्या वर!

देशात आजघडीला १ लाख ५८ हजार ३३३ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांमध्येच देशात तब्बल ६ हजार ५६६ रुग्ण सापडले आहेत. त्याशिवाय देशात ४ हजार ५३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी छातीत धडकी भरवणारी असली, तरी जगभरातल्या परिस्थितीपेक्षा भारतातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, असं असलं, तरी भारतातल्या वैज्ञानिक संस्था आणि प्रयोगशाळा फक्त शांत बसून परिस्थितीचं निरीक्षण करत नसून कोरोनावर मात करण्यासाठीची लस शोधण्याचं काम भारतात सध्या वेगाने सुरू आहे.

- Advertisement -

लस तयार करणं खूप मोठं आव्हान!

के. विजय राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजघडीला ३० आघाडीच्या संस्था कोरोनावर लस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही संस्था आहेत, तर काही शास्त्रज्ञ वैयक्तिक पातळीवर देखील ही लस शोधण्याच्या मागावर आहेत. यामध्ये २० संस्था आणि व्यक्ती या अतिशय वेगाने ही लस बनवण्याच्या प्रक्रियेत मार्गक्रमण करत असून इतर १० संस्था देखील आत्मविश्वासाने त्या दिशेने वाटचाल करत आहेत. ‘सामान्यपणे अशा प्रकारची लस बनवण्यासाठी जवळपास १० वर्षांचा कालावधी लागतो. पण सध्या आख्ख्या जगाचं लक्ष्य हे आहे की वर्षभरात कोरोनाची लस तयार व्हावी. ही लस तयार करणं हे सगळ्यांसमोरचंच एक मोठं आव्हान आहे. ती खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. अशी लस बनवताना अनेक प्रयत्न अयशस्वी होत असतात. त्यामुळे तुम्हाला खूप सारे प्रयत्न करावे लागतात’, असं के. विजय राघवन यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -