घरदेश-विदेशपाकिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; खैबरमध्ये बॉम्बस्फोटात ३० जण ठार

पाकिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; खैबरमध्ये बॉम्बस्फोटात ३० जण ठार

Subscribe

पाकिस्तान आज दोन बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पाकिस्तानच्या कराचीनंतर खैबरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानासाठी आजचा दिवस काळादिवस ठरला आहे. पाकिस्तानामध्ये दोन बॉम्बस्फोटामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवाना लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या कराचीतील चिनी दूतावासाजवळ मोठा बॉम्बस्फोटानंतर खैबर पख्तूनख्वातील हंगू शहर देखील स्फोटाने हादरले आहे. या स्फोटामध्ये ३० जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बॉम्बस्फोटात ३० जण ठार

हा बॉम्बस्फोट उत्तर – पश्चिम पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हंगू शहरामधील एका मार्केटमध्ये झाला आहे. मार्केटमध्ये मोठी गर्दी असताना हा बॉम्बस्फोट करण्यात आला त्यामुळे या बॉम्बस्फोटामध्ये ३० नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळाला घेरावा घातला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. हा स्फोट कसा झाला याचा तपास पोलिसांकडून लावला जात आहे. बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

कराचीमध्ये बॉम्बस्फोट

यापूर्वी आज सकाळी कराचीच्या चीन दुतावासाजवळ मोठा बॉम्बस्फोट करण्यात आला. पाकिस्तानमधील सर्वात सुरक्षित भागामध्ये शुमार कराचीच्या क्लिफटॉन भागामध्ये हा बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोट आणि गोळीबारामध्ये दोन पोलीस कर्चमाऱ्यांचा मृत्यू झाला. या बॉम्बस्फोटानंतर चार हल्लेखोरांपैकी ३ हल्लेखोरांना ठार करण्यात आले आहे.

तीन हल्लेखोरांना केले ठार

पाकिस्तानी मीडियाने सांगितले की, काही हल्लेखोर दूतावासाच्या आतमध्ये घुसण्यासाठी यशस्वी झाले. दूतावासाच्या छतावरुन पोलिसांना लक्ष्य केले गेले. कराची पोलिसांना तीन हल्लेखोरांना ठार करण्यात यश आले. मात्र एका हल्लेखोराचा शोध कराची पोलिसांकडून सुरु आहे. ठार करण्यात आलेल्या हल्लेखोरांकडून एक सुसाइड जॅकेट जप्त केले गेले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -