घरदेश-विदेशसीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत, लष्कराची माहिती

सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत, लष्कराची माहिती

Subscribe

नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा आज खात्मा करण्यात आला

सीमेपलीकडील लॉंच पॅड्वरून २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर मधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा आज खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी नौगाम सेक्टमध्ये लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. या भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने जवान सतर्क झाले. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.

- Advertisement -

यासह आणखी एक महत्त्वाची माहिती लष्कराने दिली आहे. नौगाम सेक्टरमध्ये लष्कराने केलेल्या कामगिरीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमे पलीकडील लॉंच पॅड्वर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. हे दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सीमे पलीकडील लॉंच पॅड्वर सज्ज असून तिथे २५० ते ३०० दहशतवादी तयारीनिशी असल्याचं वत्स यांनी सांगितलं. त्यानुसार घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांचा आज खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे  शस्त्रसाठा आणि काही रक्कम सापडली आहे. यात भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम सापडली आहे. शिवाय एके एसॉल्ट रायफल्स, १२ मागझिन्स, एक पिस्तुल, काही ग्रेनेड देखील आढळून आले आहेत. दरम्यान, या कारवाई नंतर लष्कराकडून अद्यापही येथे शोध मोहीम राबवली जात असल्याचं वत्स यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -