घरदेश-विदेशपंजाब, उत्तराखंडनंतर आता गोव्यात ३०० युनिट मोफत वीज मिळणार; केजरीवालांची घोषणा

पंजाब, उत्तराखंडनंतर आता गोव्यात ३०० युनिट मोफत वीज मिळणार; केजरीवालांची घोषणा

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बुधवारी गोव्याला पोहोचले. तेथे त्यांनी पत्रकार परिषदेत विजेच्या हमीचे आश्वासन दिले. पंजाब आणि उत्तराखंडानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता गोव्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार बनल्यास ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. यासह त्यांनी सर्व जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासनही दिले आहे.

- Advertisement -

गोव्यातील आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असेही सांगितले की, “प्रत्येक कुटूंबाला दरमहा ३०० युनिट पर्यंत वीज दिली जाईल. यासह सर्व जुनी वीज बिले माफ केली जातील. आम्ही शेतकऱ्यांना २४ तास वीज देऊ. तसेच संपूर्ण गोव्याला मोफत वीज दिली जाईल. गोव्यात राजकारण खूप वाईट झाले आहे. लोकांनी सरकार स्थापण्यासाठी कॉंग्रेसला मतदान केले आणि सरकार भाजप बनले. गोव्यातील लोकांना आता स्वच्छ राजकारण हवे आहे.”

गोवा दौर्‍याच्या एक दिवस अगोदरच अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, गोव्यातील जनतेला बदल हवा आहे. गोव्यात घाणेरडे राजकारण झाले आहे. गोव्याला विकास हवा आहे. निधीची कमतरता नाही, केवळ प्रामाणिक हेतूचा अभाव आहे. गोव्याला प्रामाणिक राजकारण हवे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल उत्तराखंड येथे पोहोचले होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी अशाच प्रकारचे आश्वासन दिले होते. दरम्यान, उत्तराखंडमध्ये काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अनेक राज्यांत भेटी देऊन आम आदमी पक्षाच्या प्रचार करीत आहेत.

- Advertisement -

यासह अरविंद केजरीवाल यांनी हमीभावाचे चार आश्वासन देखील दिले होते. “भ्रष्टाचाराचे वाईट राजकारण संपले पाहिजे. आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये फरक नाही. लोकांना बदल हवा आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी आश्वासनं देतो की मी जे बोलतो ते करतो. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चारही आश्वासनांची घोषणा केली. यात पहिल्या आश्वासनानुसार प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज मोफत मिळणार आहे. दुसर्‍या आश्वासनानुसार सर्व जुनी वीज बिले माफ केली जातील. तिसर्‍या आश्वासनानुसार गोव्याला २४ तास वीज देण्यात येईल. चौथ्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येईल.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -