घरताज्या घडामोडी३ हजार कोटींचा बाईक बोट घोटाळा; ईओडब्ल्यूकडून ५ जिल्ह्यात छापेमारी

३ हजार कोटींचा बाईक बोट घोटाळा; ईओडब्ल्यूकडून ५ जिल्ह्यात छापेमारी

Subscribe

मेरठ, हापूड, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, बागपत जनपद जिल्ह्यात छापे टाकण्यात आले.

नोएडा व राज्यातील विविध जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दुचाकी बोट घोटाळ्याप्रकरणी आज पोलीस पथकाने छापा टाकून मोठ्या संख्येने दुचाकी जप्त केल्या आहेत. मेरठ झोनच्या ईओडब्ल्यू टीमने छापा मारण्यासाठी पाच टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर मेरठ, हापूड, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, बागपत जनपद जिल्ह्यात छापे टाकण्यात आले.

काय आहे प्रकरण

विशेष म्हणजे सन २०१९ मध्ये बाइक बोट घोटाळ्याप्रकरणी नोएडा आणि राज्यातील विविध जिल्ह्यात ५६ एफआयआर नोंदविण्यात आले. सरकारच्या आदेशानुसार, १४ फेब्रुवारी रोजी या सर्व प्रकरणांची चौकशी आर्थिक कार्यालय शाखेकडे (Economic Office Wing) सोपविण्यात आली. घोटाळ्यामध्ये जे उघड झाले त्यानुसार, संजय भाटी कंपनी, गर्वित इनोव्हेटिव्ह प्रमोटर्स लिमिटेड ने एक योजना सुरू केली. त्यामध्ये प्रत्येक बाईक ६२,२०० रुपये जमा करण्याच्या बदल्यात आणि दुचाकी टॅक्सी म्हणून दरमहा ९७६५ रुपये देण्याचे आमिष दिले गेले. आणि एक वर्षांपर्यंत हा सौदा चालला. यानंतर लाखो लोक फ्रँचायझी या योजनेत सामील झाले आणि संजय भाटी याच्या कंपनीने बाजारातून सुमारे ३ हजार कोटी रुपये जमा केले. सुरुवातीला काही लोकांना महिन्यानुसार रक्कम परत करण्यात आली, परंतु काही महिन्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. ही सर्व रक्कम वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतविली गेली, त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय भाटी यांच्यासह १९ जणांना तुरूंगात कैद करण्यात आले आहे.

- Advertisement -

डीजी ईओडब्ल्यू आरपी सिंह म्हणाले की, दुचाकी बोट घोटाळ्यात मेरठ झोनच्या ईओडब्ल्यू टीमने छाप्यासाठी पाच पथके तयार केली होती. त्यानंतर मेरठ, हापूड, गाझियाबाद, मुजफ्फरनगर, बागपत येथे छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये मुजफ्फरनगरच्या शिल्पी राजच्या गोदामातून नवीन ५० दुचाकी, गाझियाबादच्या मुरादनगरमधील इंटर कॉलेजमधून २५ दुचाकी, गाझियाबादच्या कुलदीप त्यागी याच्याकडे ४७ दुचाकी, हापूड येथील राजेश राणीच्या भाड्याच्या गोदामातून २२ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. कंपनीच्या फ्रेंचायसी असलेल्या मेरठचा विकास लांबा याच्याकडून २१ दुचाकी आणि बागपतमधील कपिल कुमारकडून १३ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -