घरदेश-विदेशओदिशामध्ये सापडला ३२ किलोचा मासा; लाखांमध्ये झाला लिलाव

ओदिशामध्ये सापडला ३२ किलोचा मासा; लाखांमध्ये झाला लिलाव

Subscribe

या माश्याची बोली दीघामध्ये लावण्यात आली होती. ५५ किलोचा हा मासा १३ लाख रूपयांमध्ये विकला गेला.

ओदिशाच्या भद्रक जिल्ह्यातील चांदबली परिसरामध्ये एका मासेमाराच्या हाती ३२ किलो वजनाचा मासा लागला असून त्या मासेमाराने ती ३,२०,००० रूपयांना विकलेली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी आदिशामध्ये एका मासेमाराला २८ किलो वजनाचा मासा हाती लागला होता, ज्याची किंमत ६ लाख ४४ हजार असल्याचं म्हटलं जात होत. २३ हजार प्रति किलो दरात एका मुंबईकराने त्या माश्याची खरेदी केली होती. या माश्याचा जगतसिंहपुर जिल्ह्यातील बालीमध्ये लिलाव करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात मासेमारांनी समुद्रातून ४ तोलिया बोराई हा मासा सापडला होता. त्यातील एका माश्याची किंमत ६ लाखपेक्षा जास्त होती आणि बाकी ३ माश्यांना ४२०० रूपये प्रति किलो दरात १ लाख ६३ हजार ८०० रूपयांमध्ये विकलं गेलं होतं. याप्रकारे ४ तोलिया बोरोई मासे ८ लाख ७ हजार ८०० रूपयांमध्ये विकले गेले होते.

- Advertisement -

१३ लाख रूपयांचा मासा

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापुरमध्ये शिवाजी कबीर नावाच्या एका माश्येमाऱ्याने तोलिया भोला नावाचा हा विशाल मासा पकडला आहे. या माश्याची बोली दीघामध्ये लावण्यात आली होती. ५५ किलोचा हा मासा १३ लाख रूपयांमध्ये विकला गेली. या माश्याला एका परदेशातील एका कंपनीने विकत घेतलं आहे. या माश्यापासून औषध तयार केले जाते. त्यामुळेच याची किंमत जास्त असते.


हेही वाचा :पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी, ममतांच्या निकटवर्तीयाकडून तब्बल 20 कोटी जप्त

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -