Andhra Pradesh Rains: मुसळधार पावसाने आंध्र प्रदेशला झोडपले; आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू

34 dead due to floods in andhra pradesh rains rainfall
Andhra Pradesh Rains: मुसळधार पावसाने आंध्र प्रदेशला झोडपले; आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण अजूनही बेपत्ता आहेत. याबाबतची माहिती सोमवारी राज्य सरकारने दिली. एसपीएस नेल्लोर जिल्ह्याच्या पादुगुपाडू जवळील खराब झालेल्या भागात काम पूर्ण झाल्यानंतर विजयवाडा-चेन्नई विभागातील एक रेल्वे लाईन सोमवारी वाहतुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे.

चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-१६ देखील वाहतुकीसाठी अंशतः पूर्ववत करण्यात आला आहे. शनिवारी उशिरा रात्रीपासून एसपीएस नेल्लोर जिल्ह्यात बंद करण्यात आला होता. चित्तूर, अनंतपुरमू, कडपा आणि एसपीएस नेल्लोर जिल्ह्यामध्ये पुराबाबत विधानसभेत कृषिमंत्री के. कन्ना बाबू म्हणाले की, ३४ मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बचाव पथकातील ३ जणांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जातील. तसेच बचाव पथकातील जीव गमावणारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना २५ रुपये दिले जातील आणि कुटुंबातील एक सदस्याला नोकरी दिली जाईल.

पुढे कन्ना बाबू म्हणाले की, पुरामुळे ८ लाख एकरहून अधिक क्षेत्रात शेती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे ५ लाख ३३ हजार ३४५ शेतकरी संकटात आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची संपूर्ण गणना केली जाईल. सरकारने ८० टक्के अनुदानावर नवीन बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री वाई.एस.जगन मोहन रेड्डी यांनी पूरग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन मदत कार्याची माहिती घेतली होती.


हेही वाचा – Farmers Delhi March: केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी २६ नोव्हेंबरला शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत