घरदेश-विदेश350 वा शिवराज्यभिषेक सोहळा : मॉरिशसमध्ये उद्या शिवरायांच्या 14 फुटी पुतळ्याचे होणार...

350 वा शिवराज्यभिषेक सोहळा : मॉरिशसमध्ये उद्या शिवरायांच्या 14 फुटी पुतळ्याचे होणार अनावरण

Subscribe

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात रायगडावर साजरा करण्यात आला. या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आता भारताबाहेरील इतर ठिकाणीही कार्यक्रम साजरे होणार आहेत. मॉरिशसमध्ये उद्या (4 जून) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 14 फूट फायबर पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. (14 feet statue of Shivaji maharaj to be unveiled in Mauritius tomorrow)

मॉरिशसमध्ये मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली अर्जून पुतळाजी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या संदर्भात अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम 4 जून 2023 रोजी ब्लॅक नदीतील गणेश पावन मंदिर येथे शिवाजी महाराजांच्या 14 फूट फायबर पुतळ्याचे अनावरण केले जाईल. या कार्यक्रमास मॉरिशसचे उपराष्ट्रपती मारिये सिरिल इडी बोईसेसजॉन उपस्थित राहणार आहेत. त्याच्याशिवाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसह इतर 100 कलाकारांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होणार आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने 15 संघटनांना शिवाजी महाराजांचे 28 इंच उंचीचे 15 फायबर पुतळे मोफत वाटण्यात येणार आहेत. पुणे येथील श्री विठ्ठलराव किसन चव्हाण यांनी हा पुतळा मॉरिशच्या मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टला दान केला आहे. बडोद्यातील उज्ज्वलसिंग राजे गायकवाड यांच्यासमवेत पुण्यातील अंतरराष्ट्रीय कीर्तनकार शिवभूषण ह.भ.प. श्री रोहिदास महाराज हांडे उपस्थित आहेत आणि मॉरिशसमधील या अनोख्या कार्यक्रमाला पुण्यातील 20 पाहुणे उपस्थि आहेत. सांगली येथील शाहीर प्रसाद विभुते हे देखील कार्यक्रमाला सादरीकरणासाठी उपस्थित आहेत. या संस्मरणीय कार्यक्रमासाठी काळ्या नदीचे गाव निवडण्यात आले आहे. कारण कोकणातील महाराष्ट्रातील पहिली मराठी जनता 1834 ते 1841 या काळात या भागात विशेषतः काळ्या नदीघाटात स्थायिक झाले होते.

दरम्यान,  किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. किल्ल्यावर शाही शोभायात्रा देखील काढण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चांदीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकाचा विधी करण्यात आला. किल्ले रायगडावर राज्यभिषेक सोहळा उत्तमरित्या पार पडवा याासाठी राजदरबार उभारण्यात आला होता, तसेच शिवभक्तांची उत्तम सोयही करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -