Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाखांच्या उंबरठ्यावर!

92,605 Covid-19 cases and 1,133 deaths, India’s tally over 5.4 million
Corona Update: देशात २४ तासांत १,१३३ रुग्णांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या ५४ लाख पार!

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत ३७ हजार ७२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६४८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ९२ हजार ९१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २८ हजार ७३२ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५३ हजार ५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख ११ हजार १३३ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

२१ जुलै पर्यंत देशात १ कोटी ४७ लाख २४ हजार ५४६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी मंगळवारी ३ लाख ४३ हजार २४३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर तामिळनाडूत, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडून आणि दिल्ली या तीन राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २७ हजार ३१, तामिळनाडूतील १ लाख ८० हाजर ६४३ आणि दिल्लीतील १ लाख २५ हजार ९६वर पोहोचली आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या जास्त आहे.


हेही वाचा – Corona: कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू