घरदेश-विदेशहिंदी महासागरात चिनी जहाजासह 39 जण बुडाले; भारतीय नौदलाने केली मदत

हिंदी महासागरात चिनी जहाजासह 39 जण बुडाले; भारतीय नौदलाने केली मदत

Subscribe

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी चीनचे एक मासेमारी जहाज लु पेंग युआन यू 028 हिंद महासागरात बुडाले. या जहाजासह 39 नागरिकही बुडाले. चीनने खूप प्रयत्न केले पण त्यांना आपले नागरिक सापडले नाही. त्यामुळे त्यांनी भारतीय नौदलाकडे (Indian Navy) मदत मागितली. नौदलनाने त्यांच्या विनंतीला मान देत पुन्हा एकदा औदार्य दाखवले आणि बुधवारी आपले विमान P8I तैनात केले. (Chinese fishing vessel Lu Peng Yuan U 028 sank in the Indian Ocean)

भारतीय नौदलाने सांगितले की, चीनच्या विनंतीनंतर त्वरित मानवतावादी कृतीचा एक भाग म्हणून, P8I विमानाने भारतापासून सुमारे 900 समुद्री मैलांच्या दक्षिणेकडील हिंद महासागर प्रदेशात नागरिकांचा शोध घेतला. प्रतिकूल हवामानात विमानाने सखोल शोध मोहीम राबवताना जहाजाशी संबंधित बुडालेल्यांच्या सामानापैकी अनेक वस्तू शोधून काढल्या आहेत. जहाजात 17 चिनी, 17 इंडोनेशियन आणि 5 फिलिपिनो क्रू मेंबर होते. यापैकी कोणीही आतापर्यंत सापडलेले नाही. बुडालेल्या जहाजाचे नेमके ठिकाण सांगण्यातही चीनला अपयश आले असले तरी भारतीय नौदल ते जहाज यशस्वीपणे शोधून काढले. चीनने आपले जहाज शोधण्यासाठी दोन जहाजे तैनात केली आहेत. नौदलाची विमाने त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

- Advertisement -

भारतीय नौदलाने सांगितले की, चीनच्या विनंतीवरून अपघातस्थळी एसएआर उपकरणे तैनात केली आहेत. समुद्रावरील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताने एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. भारतीय नौदलाच्या युनिट्सनी देखील या क्षेत्रातील इतर युनिट्ससह SAR प्रयत्नांचे समन्वय साधले आणि PLA (N) युद्धनौकांना घटनास्थळी निर्देशित केले.

भारतासह इतर देशही मदतीसाठी पुढे
भारताव्यतिरिक्त चीनने इतर अनेक देशांकडूनही मदत मागितली होती. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव आणि फिलिपाइन्स चीनी जहाजाच्या शोध आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. ड्रिफ्ट मॉडेलिंगच्या आधारे 12,000 चौरस किमी क्षेत्र अन्वेषणाची ओळख झाली आहे. चीनच्या सरकारी मीडियाच्या वृत्तानुसार, चीनला दोन लोकांचे मृतदेह सापडले आहेत, पण त्यांनी मृतांची ओळख जाहीर केलेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -