Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 3D Printed Post Office : प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; देशातील पहिले 3D...

3D Printed Post Office : प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस ‘या’ शहरात

Subscribe

3D Printed Post Office : तंत्रज्ञानाच्या जगात भारत देश इतर देशांना चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे भारताने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले देशातील पहिले ‘3D पोस्ट ऑफीस’ (3D Printed Post Office) आहे. बेंगळुरूमध्ये (bengaluru) असलेल्या या पोस्ट ऑफीसला ‘थ्रीडी प्रिंटेड’ पोस्ट ऑफीस, असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज (18 ऑगस्ट) या या पोस्ट ऑफीसचे उद्घाटन केले आहे. (3D Printed Post Office Every Indian will be proud Countrys first 3D printed post office in this city)

हेही वाचा – आर्थिक लाभासाठी काही डॉक्टर आपला पेशा बदनाम करतायत, ओरिसा हायकोर्टाची टिप्पणी

- Advertisement -

‘3D पोस्ट ऑफीस’ बेंगळुरूच्या केंब्रिज लेआउटमध्ये 1,100 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. हे पोस्ट ऑफीस थ्रीडी कॉंक्रिट प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले असून हे त्रिमितीय संरचना तयार करण्यासाठी संगणकाच्या साहाय्याने डिझाइन तयार करते. विशेष म्हणजे हे पोस्ट ऑफीस फक्त 23 लाख रुपयांमध्ये बांधले गेले आहे. जे एका पोस्ट ऑफिस इमारतीच्या खर्चापेक्षा 30-40 टक्क्याने कमी आहे. तसेच ते अधिक टिकाऊ आणि नैसर्गिक आपत्तींना प्रतिरोधक आहे. या पोस्ट ऑफीसमुळे येणाऱ्या काळात देशात थ्रीडी प्रिंटिंग उत्पादनाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

अश्विनी वैष्णव यांच्याकडून थ्रीडी पोस्ट ऑफिसचा व्हिडिओ शेअर

- Advertisement -

थ्रीडी पोस्ट ऑफिसचा व्हिडिओ शेअर करताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, भारतातील पहिले 3डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार होणे, ही आत्मनिर्भर भारताची ताकद आहे. त्याचे नाव केंब्रिज लेआउट पोस्ट ऑफिस असे ठेवण्यात आले आहे. तसेच उद्घाटनप्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, बेंगळुरू शहर नेहमीच भारताचे प्रतिनिधित्व करत आले आहे. हे 3D पोस्ट ऑफिस म्हणजे आजच्या भारताचा आत्मा आहे, विकासाचा आत्मा आहे. यामुळे भारत प्रगती करत आहे. आपले तंत्र विकसित करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे हीच खरी भावना आहे. हे सर्व तेव्हाच शक्य झाले आहे जेव्हा देशाचे नेतृत्व आपल्या जनतेवर विश्वास असलेल्या निर्णायक व्यक्तीच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असेल.

नावीन्य आणि प्रगतीचा पुरावा सांगितला

थ्रीडी पोस्ट ऑफिसचे फोटो शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, बेंगळुरूमध्ये भारताचे पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. आपल्या देशाच्या नवकल्पना आणि प्रगतीचा हा पुरावा आहे. हे पोस्ट ऑफीस स्वावलंबी भारताच्या भावनेचेही प्रतीक आहे. पोस्ट ऑफिस पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या सर्व लोकांचे मोदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – “भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना मजबूत करणे आवश्यक”; RSS नेते दत्तात्रेय होसाबळे

अवघ्या 44 दिवसांत थ्रीडी पोस्ट ऑफीस तयार

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या केंब्रिज लेआउटमध्ये तयार करण्यात आलेल्या थ्रीडी पोस्ट ऑफिसच्या कामाला 21 मार्च 2023 पासून सुरुवात झाली आणि 3 मे रोजी काम पूर्ण झाले. ते तयार करण्यासाठी फक्त 44 दिवस लागले. त्याची रचना आयआयटी मद्रासने तयार केली आहे. याशिवाय लार्सन अँड टुब्रो कंपनीने थ्रीडी काँक्रीट पेंटिंग तंत्रज्ञान वापरून ते तयार केले आहे. लार्सन अँड टुब्रोने यापूर्वी 3D इमारती बांधल्या आहेत. कांचीपुरम, तामिळनाडू येथे भारतातील पहिली 3D-मुद्रित इमारत तयार करण्यात आली आहे. त्यात स्वदेशी उपलब्ध नियमित बांधकाम साहित्याचा वापर करून घरगुती विकसित केलेल्या काँक्रीट मिश्रणाचा समावेश होता. 240 चौरस फूट 1BHK ची L&T टीमने नोव्हेंबर 2019 मध्ये 3D-प्रिंट तयार केली होती.

- Advertisment -