घरCORONA UPDATECoronavirus : देशात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नीति आयोगाने सांगितल्या 'या' उपाययोजना

Coronavirus : देशात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नीति आयोगाने सांगितल्या ‘या’ उपाययोजना

Subscribe

देशात कोरोना विषाणुची तिसरी लाट रोखण्यासाठी आता केंद्रीय आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. यातच नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) वी.के.पॉल यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखणे आपल्या हातात असल्याचे सांगत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यावर बोलताना वी.के.पॉल म्हणाले की, कोरोनापासून वाचण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले आणि प्रत्येकाने लस घेतल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल. लसीकरणावर बोलताना वी.के पॉल म्हणाले की, देशात सोमवारपासून लसीकरण मोहीमेचा वेग वाढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान काल भारताच्या लसीकरण मोहिमेचा ऐतिहासिक दिवस होता. कारण एकाच दिवसात देशात ८६.१६ लाखपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एका दिवसाची आकडेवारी पाहता असे दिसून येते की, येत्या काही दिवसांत देशातील लसीकरण मोहीम आणखी मोठ्याप्रमाणात सुरु असेल. असेही वी.के.पॉल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशात नवीन लस धोरण राबवत सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकार लसींचा साठा खरेदी करुन तो प्रत्येक राज्याला देणार आहे. त्यानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन लसींचा डोस घेऊ शकतात.

- Advertisement -

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या( (MoHFW) निवेदनाचा हवाला देत पॉल म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारांमधील नियोजन आणि समन्वयामुळे हे सर्व शक्य झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ द्याची की नाही हे आपल्या हातात आहे. जर आपण कोरोनाविरोधी मार्गदर्शक सुचनांचे आणि लस घेतल्यास तिसरी लाट कशी येईल? असे बरेच देश आहेत जेथे कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. त्यामुळे जर आपणही सर्व गोष्टींची काळजी घेतली तर ही वेळही निघून जाईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -