घरक्रीडाब्राझीलमध्ये विमान दुर्घटनेत क्लब अध्यक्षांसह ४ फुटबॉलपटूंचा मृत्यू

ब्राझीलमध्ये विमान दुर्घटनेत क्लब अध्यक्षांसह ४ फुटबॉलपटूंचा मृत्यू

Subscribe

कोपा वर्ड मॅचसाठी व्हिला नोव्हा विरुद्ध फुटबॉल खेळण्यासाठी गोयनिया सिटीला हे विमान चालले होते.

ब्राझीलमध्ये एका विमान दुर्घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या एका लोकल फुटबॉल मॅचच्या आधी विमान क्रॅश झाल्याने या दुर्घटनेत ब्राझीलचे फुटबॉल क्लब पालमासचे अध्यक्ष आणि चार फुटबॉल खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. क्लबने सांगितल्याप्रमाणे, क्लबचे अध्यक्ष लुकास मीरा आणि त्याच्यासोबत असलेल्या चार फुटबॉल खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. लुकास प्रैक्सिडेस, गुइलहेम नोए, रानूल आणि मार्कस मोलिनारी अशी मृतांची नावे आहेत. रविवारी ब्राझिलच्या उत्तर शहराच्या पलमास येथे टोकेनटेंस एयरफिल्ड विमान टेकऑफ करताना क्रॅश झाले. यात विमान चालवणाऱ्या पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

सोमवारी कोपा वर्ड मॅचसाठी सुमारे ८०० किमी दूर पर्यंत करत होते. कोपा वर्ड मॅचसाठी व्हिला नोव्हा विरुद्ध फुटबॉल खेळण्यासाठी गोयनिया सिटीला हे विमान चालले होते. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, खेळाडू आणि क्लबचे अध्यक्ष आपल्या टिमसोबत प्रवास करत नव्हते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेले हे विमान दोन इंजिन असलेले बॅरॉन मॉडेलचे विमान होते. विमान क्रॅश होताच त्याला आग लागली. या संपूर्ण घटनेची सध्या चौकशी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगतिले आहे.

- Advertisement -

पाच वर्षांपूर्वीही कोलंबिया येथे अशाच प्रकारची विमान दुर्घटना झाली होती. या विमान दुर्घटनेत तब्बल १९ खेळाडूंनी आपला जीव गमावला होता. त्याचप्रमाणे २०१४ साली पूर्व आंतरराष्ट्रीय आणि ब्राझिलचे स्ट्राइकर फर्नांडो यांची ब्राझिलमध्ये एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता.


हेही वाचा – आहे पंत बरा जरी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -