महिलेच्या गर्भाशयातून ४ किलो वजनाचा ट्यूमर काढला

दिल्लीच्या गंगा राम हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या गर्भाशयातून ४ किलो वजनाचा म्हणजे एका नवजात अर्भकाच्या वजनाचा ट्यूमर शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला आहे. हा ट्यूमर काढणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांना यश आले असून महिलेला ६ दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे.

4kg big size tumor found from woman stomach
४ किलो वजनाचा ट्यूमर महिलेच्या गर्भाशयात आढळला

दिल्लीतील डॉक्टरांनी एका महिलेच्या गर्भाशयातून ४ किलो वजनाचा ट्यूमर काढला आहे. दिल्लीच्या गंगा राम हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ४७ वर्षाच्या महिलेच्या गर्भाशयातून हा ट्यूमर काढण्यात आला आहे. जवळपास तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ट्यूमरला काढायला डॉक्टरांना यश आले.

४ किलो वजनाचा ट्यूमर

जानेवारीमध्ये ४७ वर्षाची महिला गंगा राम हॉस्पिटलमध्ये आली होती. गेल्या १० वर्षापासून पोटात दुखते तसंच मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असल्याची तक्रार महिलेने डॉक्टरांकडे केली. डॉक्टरांनी महिलेच्या सर्व तपासण्या केल्यानंतर तिच्या गर्भाशयामध्ये एका नवजात अर्भकाच्या वजनाचा ट्यूमर आढळून आला. या ट्यूमरचे वजन ४ किलो असल्याचे समोर आले.

पोट दुखीचा जास्त त्रास होऊ लागला

महिलेची सोनोग्राफी केली असता तिच्या गर्भाशयामध्ये ३४ आठवड्यांच्या अर्भकाऐवढा ट्यूमर आढळला. २००९ मध्ये तिने केलेल्या सोनाग्राफीमध्ये तिच्या गर्भाशयामध्ये ३.३ X २.३ सेमीचा फॅब्रॉईडचा ट्यूमर आढळला होता. हा ट्यूमर कॅन्सरचा नसल्याचे निदान झाले होते. त्यावेळी या महिलेने फॅूब्रॉईडच्या ट्यूमरवर काहीच उपचार केले नव्हते. मात्र पोटामध्ये जास्त दुखायला लागल्यानंतर महिलेने पुन्हा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

जलद गतीने ट्यूमरमध्ये झाली वाढ

४ महिन्यापूर्वी ही महिला जेव्हा गंगा राम हॉस्पिटलमध्ये आली. त्यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये महिलेच्या पोटातील फॅब्रॉईडच्या ट्यूमरमध्ये वाढ झाल्याचे समोर आले. २३सेमी X 23सेमी X 16 सेमीचा ट्यूमर आणि त्याचे वजन ४ किलो असल्याचे तापसणीनंतर समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. गंगा राम हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ विभागातील तंज्ज्ञ डॉक्टरांनी या ट्यूमरला शस्त्रक्रिया करुन काढले.

“ही एक अनोखी केस होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आकाराचा, ज्याची जलद वाढ हा ट्यूमर होता. या केसने आम्हाला आश्चर्यचकित केले, कारण ट्यूमरबद्दल जाणून घेण्याव्यतिरिक्त, आजवर कोणतेही सक्रिय व्यवस्थापन आम्ही केले नव्हते. या ट्यूमरचा मोठा आकार, त्याची अनिश्चित स्थिती आणि कॅन्सरच्या स्थितीची शक्यता, तसेच त्याला ऑपरेशन करुन काढणे आम्हाला आव्हानात्मक होते.” – डॉ. देबासिस दत्ता, वरिष्ठ सल्लागार, स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग, गंगा राम हॉस्पिटल

ट्यूमर काढणे डॉक्टरांसमोर होते मोठं आव्हान

ट्यूमरचा आकार मोठा असल्याने तसंच कॅन्सर असण्याचा संशय असल्याने शस्त्रक्रिये दरम्यान ट्यूमर काढताना कमी रक्तस्त्राव होणे आवश्यक होते. हायब्रीड तंत्रज्ज्ञानाचा वापर केल्यामुळे शस्त्रक्रिये दरम्यान महिलेच्या मूत्राशय, मूत्रमार्ग आणि आतडीला काहीच दुखापत झाली नाही. शस्त्रक्रियेवेळी अंदाजे ५०० एमएल रक्त गेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. मात्र आम्हाला या शस्त्रक्रियेमध्ये यश आले असून महिला रुग्णाला ६ दिवसांनी घरी देखील सोडण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.