घरताज्या घडामोडीआसाममध्ये एका व्यक्तीने बनवली ४ सीटर स्कूटर

आसाममध्ये एका व्यक्तीने बनवली ४ सीटर स्कूटर

Subscribe

ऑटोमोबाईल क्षेत्रात आपल्याला नेहमीच अजब गोष्टी पाहायला मिळतात. आसाममध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या चार जणांच्या कुटुंबासाठी एक स्कूटर डिझाइन केली आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती व्यक्ती स्कूटर वापरताना दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वी ही स्कूटर डिझाइन केली होती. या प्रकल्पासाठी दास यांनी दोन स्कूटर खरेदी केल्या आणि त्या एकमेकांना जोडल्या. त्यामुळे आता चार जणांचे कुटुंब कोणत्याही गैरसोयीशिवाय स्कूटरवर आरामात बसू शकते. “ही स्कूटर बनवण्याचे माझे स्वप्न होते आणि आता ते पूर्ण झाले आहे. मला काहीतरी वेगळे करायचे आहे. मी तीन वर्षांपूर्वी माझे काम सुरू केले आणि शेवटी माझे ध्येय मी गाठले”, असे म्हणत स्कूटरचे मालक आणि एडी ऑटोमोबाईलचे मालक अतुल दास यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हे लक्षात ठेवा…

अशी वाहने आकर्षक असून,रस्त्यांवर नक्कीच लक्ष वेधून घेतात परंतु कधीकधी ही वाहने धोकादायक ठरु शकतात. रस्त्यावरून जाताना वाहनाचा बिघाड झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की असे बदल भारतात कायदेशीर नाहीत. भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि मोटार वाहन कायदा सार्वजनिक रस्त्यांवर अशी वाहने चालवण्यासाठी अशा प्रकारचा फेरबदल करण्यास मनाई करतो. तथापि, अशी वाहने अनेकांसाठी ‘प्रोजेक्ट कार’ असू शकतात आणि कोणीही त्यांचा रेसिंग ट्रॅक किंवा फार्महाऊस सारख्या वैयक्तिक मालमत्तेवर वापरू शकतो. मात्र, सार्वजनिक रस्त्यावरून पोलिस ते जप्त करू शकतात.

- Advertisement -

 


हे ही वाचा – IFFI : ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -