घरताज्या घडामोडीजन्मदात्यांनी ऑक्सफोर्डमध्ये शिकवली वकीली, पण नोकरी न मिळाल्याने लेकाने त्यांच्यावर केली केस

जन्मदात्यांनी ऑक्सफोर्डमध्ये शिकवली वकीली, पण नोकरी न मिळाल्याने लेकाने त्यांच्यावर केली केस

Subscribe

एका ४१ वर्षीय मुलाने आपल्या संपूर्ण आयुष्याचा खर्च उचलण्यासाठी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर तक्रार दाखल केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या मुलाचे नाव फैज सिद्दीकी आहे. या घटनेत आश्चर्याची बाब म्हणजे या मुलाने ऑक्सफोर्ड विद्यापिठात कायद्याचे शिक्षण घेतले असून तो एक ट्रेंड वकील आहे. इतका सुशिक्षित असूनही तो बेरोजगार असल्याचे दाखवून आई-वडिलांना सांभाळण्याऐवजी तो त्यांच्याकडे आयुष्यभरासाठी पैशाची मागणी करत आहे.

लंडनमध्ये ही घडना घडली आहे. फैजने सांगितले की, ‘तो गेल्या १० वर्षांपासून बेरोजगार आहे. आरोग्य समस्येमुळे कमजोर प्रौढ मुले म्हणून जगण्याचा दावा करण्यास आपण पात्र असल्याचे मत त्याने उच्च न्यायालयात मांडले आहे. त्याला थांबविणे हे त्याच्या मानवी हक्काचे उल्लंघन असल्याचे तो म्हणाला आहे.’

- Advertisement -

माहितीनुसार, जावेद (७१ वय) आणि रक्षंदा (६९ वय) या मुलाचे पालक आहेत. ते दुबईमध्ये राहतात. त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले की, ‘ऑक्सफोर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात फैजच्या आई-वडिलांनी यापूर्वीच त्याला शिकवले आहे. शिवाय त्यांना फैजला २० वर्षापूर्वीचे सेंट्रल लंडनच्या हाइड पार्कमध्ये एक घर खरेदी करून दिले आहे. ज्याची किंमत जवळपास १० कोटी असेल. त्याच्या आई-वडिलांना फैजचा आतापर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. ते प्रत्येक आठवड्यात आतापर्यंत ४० हजार रुपये खर्चासाठी देत आले आहेत. एवढेच नाहीतर महिन्यातील सुमारे दीड लाख रुपये त्याची सर्व बिले आणि खरेदी केलेल्या वस्तूंचे देत आहेत. आता कौटुंबिक वादानंतर त्याचे आई-वडील पैसे देऊन इच्छित नाही आहेत. ते खूप त्रासले आहेत. फैजने केलेली मागणी अन्यायकारक आहे. यापूर्वी त्याने त्याने ऑक्सफोर्डविरूद्ध खटल्यात आपले मानसिक आरोग्य कमकुवत असल्याचे नमूद केले होते, आता त्यास कोर्टाने फेटाळले आहे.

दरम्यान फैजने एका टॉप लॉ फर्ममध्ये प्रॅक्टिस केली होती, पण २०११ साली कुठेच नोकरी मिळाली नाही. यापूर्वी त्याने कौटुंबिक न्यायालयात आपल्या आई-वडिलांविरोधात याच अतंर्गत आणखीन एक केस दाखल केली होती, पण कौटुंबिक न्यायालयाने हे देखील फेटाळले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सब इंस्पेक्टरच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तक्रार दाखल करताच पीडितेच्या वडिलांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -