घर देश-विदेश 2035 पर्यंत 42.5 कोटी लोक करणार विमानाने प्रवास; ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितला फॉर्म्युला

2035 पर्यंत 42.5 कोटी लोक करणार विमानाने प्रवास; ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितला फॉर्म्युला

Subscribe

यावेळी बोलताना ते सिंधिया म्हणाले की, 2035 पर्यंत देशात 42.5 कोटी लोक विमानाने प्रवास करणार आहेत. सध्या देशातील विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 14.5 दशलक्ष एवढी आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ग्वाल्हेरमध्ये उद्योग संस्था सीसीआयद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय एरोस्पेस परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी 2035 पर्यंत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.(42.5 crore people will travel by air by 2035; Formula told by Jyotiraditya Scindia)

यावेळी बोलताना ते सिंधिया म्हणाले की, 2035 पर्यंत देशात 42.5 कोटी लोक विमानाने प्रवास करणार आहेत. सध्या देशातील विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 14.5 दशलक्ष एवढी आहे. यामध्ये आता झपाट्याने वाढ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -

सिंधिया पुढे म्हणाले की, प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीने चार प्रादेशिक वाहकांच्या निर्मितीसह नागरी उड्डाणाचे लोकशाहीकरण केले आहे. देशाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या विकास क्षमतेचा संदर्भ देत त्यांनी परदेशी पर्यटक, उद्योजकाना आकर्षित करून भारतात येण्यासाठी आकर्षक योजना राबविल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या मते 2035 पर्यंत देशात 42.5 दशलक्ष लोक विमानाने प्रवास करणार असून, सध्या ती संख्या 14.5 दशलक्ष एवढी आहे.

हेही वाचा : ‘इंडिया’ आघाडी म्हणजे खिचडी, कुठलाही निर्णय घेण्यास अकार्यक्षम; फडणवीसांचा हल्लाबोल

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी झाली वाढ

- Advertisement -

या वर्षी जुलैमध्ये देशांतर्गत विमान वाहतुकीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 25 टक्क्यांनी वाढून 12.1 दशलक्ष झाली आहे. ग्वाल्हेरमध्ये आयोजित या परिषदेची थीम एकात्मिक जागतिक मूल्य अशी होती त्यामध्ये ते बोलत होते.

हेही वाचा : ‘एक देश, एक निवडणूक’साठी ‘या’ माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

देशातच विमाने तयार करण्यावर भर

पुढे बोलताना सिंधिया म्हणाले की, नागरी विमान वाहतूक सेवा वाढविण्यासाठी विदेशी विमान उत्पादक कंपन्याना आपल्याकडे आकर्षित करून त्या कंपन्या आपल्या देशातच विमाने तयार करून उत्पादन विकसित करणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू शकते असेही ते म्हणाले.

- Advertisment -