घरCORONA UPDATEचीन सरकार खोटारडे, कोरोनामुळे ३३०० नाही तर ४२,००० नागरिकांचा मृत्यू

चीन सरकार खोटारडे, कोरोनामुळे ३३०० नाही तर ४२,००० नागरिकांचा मृत्यू

Subscribe

चीनमधील वुहान शहरात ज्या कोरोनाने सर्वप्रथम मृत्यूचे तांडव सुरू केले तेथे 3300 जणांचा मृत्यू झाला असून आता सर्व आलबेल असल्याचा दावा चीन सरकारने केला आहे.पण कोरोनाने वुहानमध्ये 3300 नाही तर 42,000 नागरिकांचा मृत्यू झाला असून अजूनही काही रुग्ण रुग्णालयात आहेत. असा दावा येथील स्थानिकांनी केल्याने चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

डेली मेलने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार हुबई प्रांतातील एका अधिकारी व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वुहानमध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले तेव्हा रोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण रुग्णालयात दाखल होत होते. अनेकांना रुग्णालयात जागा नसल्याने घरातच उपचार घ्यावे लागत होते. त्यातील अनेतजणांचा मृत्यू झाला. जवळ जवळ एका महिन्यात वुहानमध्ये २८ हजार मृतदेह जाळण्यात आले. आजही वेगवेगळ्या शवदाहीन्यांमध्ये मृतदेह जाळले जात आहेत. यांची संख्या दिवसाला ५०० आहे. मृताच्या नातेवाईकांना अस्थिकलश देण्यात येत आहे. त्यावरूनच हा अंदाज मांडण्यात येत आहे. वुहानमध्ये ७ फ्युनरल होम आहेत. म्हणजे दिवसाला रोज ३५००० लोकं अस्थिकलश घेऊन जात आहेत.

- Advertisement -

तसेच येथील हंकोऊ, वुचांग आणि हान्यांग येथे राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना ५ एप्रिलपर्यंत अस्थिकलश देण्यात येतील असे सांगण्यात आल्याचेही या स्थानिकांनी सांगितले आहे. सरकार ज्याप्रमाणे ज्या संख्येने मृतांच्या नातेवाईकांना अस्थिकलश देत आहे ते पाहता १२ दिवसात ४२ हजार लोकांना हे अस्थिकलश वाटण्यात येणार आहेत. यादरम्यान हंकोऊ य़ेथे फ्यूनरल होममध्ये फक्त २ दिवसाच्या आत ५ हजार अस्थिकलश वाटण्यात आले. सध्या या प्रांतात लॉकडाऊन मागे घेण्यात आले असून शाळा व कॉलेजेस सुरू करण्यात येत आहेत. पण वुहान शहराबाहेर पडण्यास व येण्यास मात्र ८ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, फ्रि एशिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वुहानमध्ये शवदाहीनी गृहात २४ तास मृतदेह जाळण्यात येत आहेत. यामुळे चीनने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा चुकीचा सांगितला असून जगाची दिशाभूल केली आहे. अमेरिकेनेही चीनच्या पारदर्शकतेवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उभारले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -