घरदेश-विदेशहिमाचल प्रदेशातील बस अपघातामध्ये आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील बस अपघातामध्ये आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

Subscribe

बसमध्ये ७० ते ७५ प्रवाशी असण्याचा अंदाज

हिमाचल प्रदेशात गुरुवारी दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला होता. या अपघातामधील मृत्यूच्या संख्येत भर पडली आहे. काल संध्याकाळपर्यंत या अपघातामध्ये ३३ लोकांचा मृत्यू झाला होता. पण आज मृतांचा आकडा ४४ झाला आहे. तसेच ३० लोक जखमी झाले आहेत. या बसमध्ये ७० ते ७५ प्रवाशी असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कुल्लूतील पोलीस निरीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी असे सांगितले की, बसच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसमध्ये होते. ही बस बंजार जिल्हाच्या येथील वळणाजवळ ३०० फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगितले.

ही बस कुल्लूवरुन गादागुशानी येथे जात होती. या बसमध्ये काही विद्यार्थी कॉलेजचे अॅडमिशन घेऊन घरी परतत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बस दरीत कोसळलताच बसचा चक्काचूर झाला. कालपर्यंच या घटनेत १२ महिला, ६ मुली, ७ लहान मुलांचा आणि १० तरुणांचा बचाव करण्यात यश मिळाले होते.

- Advertisement -

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही या दुर्घनेटबद्दल टि्वट केले आहे. ‘हिमाचल प्रदेशात कुल्लूत झालेल्या बस दुर्घनेटबद्दल कळल्यावर अतिशय दुःख झाले आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. तसेच जखमी झालेल्या लोकांची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.’

- Advertisement -

तसेच नरेंद्र मोदींच्या कार्यालयानेही या दुर्घनेटबाबत टि्वट केले आहे. ‘कुल्लूमधील झालेल्या बस दुर्घनेटमुळे खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबाचे सांत्वन करतो. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. केंद्राकडून हिमाचल प्रदेशातील सरकारला सर्व प्रकारची मदत केली जाईल,’ असे टि्वट केले आहे.

या घटनास्थळी हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री भेट देणार आहे, असे हिमाचल प्रदेशाचे परिवहन मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान, काँग्रेसचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती आणि इतर नेत्यांनी टि्वटच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -