जुलैमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद, महत्त्वाच्या कामासाठी निघण्यापूर्वी पाहा ही लिस्ट

bank holidays in august 2022 banks to remain closed for 13 days check holidays full list

दर महिन्यात विविध सण-समारंभानिमित्त देशात बँकांना सार्वजनिक सुट्ट्या असतात. यामुळे अनेकदा असे घडते की, बँकेसंबंधित महत्त्वाच्या कामांना उशीर होतो. पण तुमचे जुलै महिन्यातही बँकेसंबंधीत महत्त्वाचे काम असेल तर त्वरित करावे, कारण येत्या जुलै महिन्यात बँका जवळपास 14 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असेल ही लिस्ट पाहूनच जा…

जुलै महिन्यात विविध सण समारभांनिमित्त बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. याच महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होत असल्याने मुलांच्या प्रवेशासाठी आणि इतर खर्चांसाठी पैशांची गरज लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला पैसे वेळेत उपलब्ध न झाल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून बँकेशी संबंधित काही काम असेल तर वेळेत पूर्ण करा, कारण जुलै महिन्यात अनेक सुट्ट्या चालून आल्या आहेत.

जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी

१ जुलै: कांग रथयात्रा (भुवनेश्वर)

७ जुलै: खारची पूजा (आगरतळा)

९ जुलै: ईद अल-अधा किंवा बकरी ईद  (कोची, तिरुवनंतपुरम)

11 जुलै: ईद-उल-अधा  (श्रीनगर, जम्मू(

13 जुलै: भानू जयंती (गंगटोक)

14 जुलै: बेहिदीनखलम- (शिलाँग)

16 जुलै: हरेला (डेहराडून)

२६ जुलै: केर पुंजा  (आगरतळा)

शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांची यादी

3 जुलै : पहिला रविवार

9 जुलै: दुसरा शनिवार + बकरी ईद

10 जुलै : दुसरा रविवार

17 जुलै: तिसरा रविवार

23 जुलै : चौथा शनिवार

24 जुलै : चौथा रविवार

31 जुलै : पाचवा रविवार

बँकांच्या या सुट्ट्या प्रत्येक राज्याप्रमाणे बदलतात. त्यामुळे एकाच रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरप्रमाणे या सुट्ट्या तुम्हाला पाहाव्या लागणार आहेत.


उपराष्ट्रपती पदाची निवडणूक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपेक्षा किती वेगळी असते?