Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रेल्वेच्या परीक्षेस निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; ४७ जणांचा मृत्यू

रेल्वेच्या परीक्षेस निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; ४७ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related Story

- Advertisement -

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ५४ प्रवाशांनी भरलेली बस मंगळवारी सकाळी सतानाच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान, बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये सर्वात अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे विद्यार्थी रेल्वेची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. मात्र, परीक्षा देण्याआधीच विद्यार्थ्यांचे आयुष्य संपले.

असा घडला अपघात

सिद्धी बस विद्यार्थ्यांना घेऊन कालव्याच्या मार्गाने निघाली होती. ही बस अत्यंत वेगात होती. त्याच दरम्यान रस्त्यावरील गतीरोधक ओलांडून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस ३० फूट खोल दरीत कोसळली. कालव्यात पाणी असल्याने बस लगेच बुडाली. प्रवाशांमधील सात जणांनी पोहोत आपले प्राण वाचवले. पण, इतर प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.

प्रवासी झोपेत होते

- Advertisement -

सकाळची वेळ असल्याने प्रवासी झोपेत होते. त्यामुळे बस पडल्यानंतर त्यांना तात्काळ हालचाल करण्यास मिळाली नाही. त्यात कालव्यातील पाण्याचा प्रवाह देखील जोरदार होता. त्यामुळे प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवता आला नाही.

मार्ग बदला आणि घात झाला

दरवेळी बस सतानाला जाताना छुहिया घाटातून जाते. मात्र, मंगळवारी नेमकी बस कालव्याच्या मार्गाने गेली. तसेच रस्ता मोकळा असल्याने बसचा वेग देखील अधिक होता. अत्यंत वेगात असलेल्या बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

पाच लाखांची मदत

- Advertisement -

अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.


हेही वाचा – अविश्वसनीय: पठ्यानं अत्याधुनिक पद्धतीने बंगल्यातच केली गांजाची शेती


 

- Advertisement -