जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १८ महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा पूर्ववत

4G internet services to be restored in Jammu and Kashmir after 18 months
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १८ महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा पूर्ववत

जम्मू-काश्मीरसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल १८ महिन्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेटची सुविधा सुरू केली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर हे निर्बंध लादले गेले होते. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० ५ ऑगस्ट २०१९ रोजी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयानंतर 4G इंटरनेटवर बंदी घातली गेली होती. सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा पूर्ववत केली जात आहे.’ दरम्यान हा जगातील सर्वात मोठा इंटरनेट शटडाऊन असल्याचे म्हटले जाते.

4G इंटरनेटवर बंदी घालण्याच्या वेळी म्हटले होते की, ‘जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा रद्द करण्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा निषेध होऊ नये, या कारणामुळे बंदी घालण्यात आली होती.’ कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर दोन भागात विभागले गेले. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश झाले. त्यानंतर ती माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांसह अनेक बड्या नेत्यांना ताब्यात घेतले होते.

यादरम्यान मोबाईलमधील इंटरनेट सेवामुळे चुकीच्या सूचनांचा फैलाव आणि दहशतवाद्यांकडून नेटवर्कचा गैरवापर थांबवण्यासाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. पण निर्णयामुळे अनेकांचे म्हणणे आहे की, इंटरनेटवरील बंदीमुळे हजारो लोकांनी रोजगार गमावले आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला.


हेही वाचा – यूपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठी खुशखबर; अजून एकदा देता येणार परीक्षा