घरCORONA UPDATECOVID-19 Wave: भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता धूसर , देशात कोरोना घेतोय...

COVID-19 Wave: भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता धूसर , देशात कोरोना घेतोय साधारण आजाराचं रुप

Subscribe

देशात गेल्या वर्षभरापासून नियंत्रणात असलेल्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरूवात केली आहे.

देशात गेल्या वर्षभरापासून नियंत्रणात असलेल्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरूवात केली आहे. दिल्ली, हरयाणामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे काही ठराविक राज्य वगळता मार्च आणि एप्रिलमध्ये इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या नगण्यच आहे. तसेच बरीच राज्य कोवीड निर्बंधमुक्त आहेत. तरीही तिथे कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. यावरून भारतात कोरोनाने सामान्य आजाराचं रुप धारण केल्याचं मत वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे माजी प्राध्यापक आणि व्हायरोलॉजिस्ट्स डॉक्टर टी जैकब जान व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

डॉक्टर जान यांच्या मते देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना आता सामान्य आजाराच रुप घेत आहे. यामुळे जेवढ्या लवकर व्यक्तीला संसर्ग होतो तेव्हढाच लवकर तो कोरोनमुक्तही होत आहे. तसेच कुठलीही महामारी झपाट्यात कमी होत नाही आणि वाढतही नाही. त्याच्या रु्ग्णसंख्येत टप्याटप्याने चढ उतार होत असतात. हा मुद्दा समजावून सांगताना जान यांनी दिल्लीचे उदाहरण दिले. सध्या दिल्लीत एक हजार रुग्णसंख्या म्हणजे एक लाखावर पाच केस. यामुळे या आकड्यांनी घाबरून न जाता. पूर्वीप्रमाणेच अजून काही महिने काळजी घेणे . मास्क लावणे अजूनही आवश्यक आहे. कारण कोरोना अजूनही पूर्णत गेलेला नाही. यामुळे मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दी टाळणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता टाळता येणार आहे.

तसेच शाळा आणि कॉलेज बंद न करता कोरोना रुग्णसंख्येचा दर बघून काही उपाययोजना कराव्यात. यामुळे रुग्णसंख्या तर आटोक्यात राहीलंच तसेच चौथी लाटेचा धोकाही टळेल. असेही डॉक्टर राणा यांनी सांगितले.

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -