घरCORONA UPDATEदेशात चौथ्या Sero Surveyची तयारी सुरु, २८ हजार लोकांचे घेण्यात येणार सँम्पल्स

देशात चौथ्या Sero Surveyची तयारी सुरु, २८ हजार लोकांचे घेण्यात येणार सँम्पल्स

Subscribe

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी हे सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्यात देशातील ग्रामीण भाग आणि तिथल्या मुलांवर काय परिणाम होत आहे याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

देशात कोरोना व्हायरसच्या (corona virus) पार्श्वभूमीवर देशात चौथ्या Sero Surveyची तयारी सुरु करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परीषद (ICMR)च्या नेतृत्वाखाली हा सर्व्हे करण्यात येणार आहे. यावेळी सर्वेक्षणात ग्रामीम भागात सर्वात जास्त भर देण्यात येणार आहे. या सर्व्हेमध्ये एकूण २८ हजार सँम्पल्स घेण्यात येणार आहेत.(4th Sero Survey started in India, samples will be taken from 28,000 people ) ज्यात १४ हजार मुले असणार आहेत आणि १४ हजार प्रौढ व्यक्ती असणार आहेत. या सर्वेक्षणात ६ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोक भाग घेऊ शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे सर्वात जास्त संक्रमण ग्रामीण भागात झाले. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी हे सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्यात देशातील ग्रामीण भाग आणि तिथल्या मुलांवर काय परिणाम होत आहे याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. देशातील हे चौथे सेरो सर्वेक्षण जून महिन्यात सुरु होऊन जून महिन्यातच संपणार आहे.

सध्या सेरो सर्वेक्षण करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. याची औरचारिक घोषणा ICMRचे महासंचालक करणार असल्याची माहिती ICMRचे एपिडेमिओलॉजी आणि कॉम्बीनेबल डिसीज हेड डॉ. सुमीरन पांडा यांनी हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला दिली.

- Advertisement -

सेरो सर्वेक्षणाचा देशाला काय फायदा?

  • सेरो सर्वेक्षणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जाणून घेण्यास मदत होणार आहे,असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • देशातील कोरोना निर्बंध कधी कमी करावे हे ठरविण्यासाठी सरकारला सेरो सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे.

फेब्रुवारी २०२१मध्ये सेरो सर्वेक्षणाच्या तिसऱ्या निकालात असे आढळून आले होते की, देशातील मोठी लोकसंख्या कोरोनामुळे असुरक्षित आहे. त्याचप्रमाणे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने असे म्हटले आहे की १७ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण केलेल्या २१.५ टक्के लोकांना आधीच्या कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. तर ५६.१३ दिल्लीच्या लोकांमध्ये कोरोना विरोधातील अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या.


हेही वाचा – Covid-19 Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ कोटी भारतीय झाले बेरोजगार

- Advertisement -

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -