घरताज्या घडामोडी4th wave of Covid : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, क्वारंटाईनसाठी जागा नाही, औषधांचा...

4th wave of Covid : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, क्वारंटाईनसाठी जागा नाही, औषधांचा तुटवडा अन् कोरोना चाचणीसाठी मारामारी

Subscribe

जगात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असताना काही देशात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याच दिसत आहे. चीनमधून कोरोनाचा प्रसार झाला होता परंतु चीनला त्याचा मोठा फटका बसला नव्हता. मात्र आता चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह झाली असल्याची माहिती मिळत आहेत. चीनच्या काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर काही राज्यात औषधं पुढील २ ते ३ दिवसांतमध्ये संपू शकते एवढे शिल्लक राहिले आहे. कोरोना चाचणीसाठीही मोठा संघर्ष नागरिकांना करावा लागत आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे चीनची परिस्थिती बिघडली आहे. २०२० नंतर सर्वात खराब परिस्थिती चीनमध्ये उद्भवली असल्याचे मीडिया रिपोर्टनुसार समजते आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील काळात चीनच्या आरोग्य सेवेवर मोठा दबाव येण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये मागील १० आठवड्यात १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉन व्हायरसमुळे कोरोना रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत चालले आहेत. यामुळे चीनला काही राज्यांमध्ये लॉकडाऊन करावा लागला आहे. येणाऱ्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेवरसुद्धा याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोना चाचणीसाठी मारामार

चीनमधील काही भागात पहिल्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव सक्रिय आहे. या भागातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी संघर्ष करावा लागत आहे. एवढेच नाही तर चीनची कठोर कोविड पॉलिसी “झिरो कोविड पॉलिसी” अंतर्गत लोकांना सक्तीने क्वारंटाईन करण्यात येत आहे. कोरोनाप्रभावित चीनमध्ये आता रुग्णालयात आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यासाठी जागा देखील शिल्लक राहिली नाही. यासाठी रुग्णालये बांधण्यात येत आहेत. तसेच अवघे २ ते ३ दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक चेन झेंगमिन म्हणाले की, पुढील २ आठवडे महत्त्वाचे आहेत कारण सध्या उचलेली पावलं कोरोना रोखण्यासाठी फायदेशीर आहेत का? याची माहिती मिळेल. मागील वर्षाच्या उपययोजनांसारखेच यंदाही कोरोना संसर्ग रोखण्यात यश येईल का? याचा आढावा घेण्यात येईल.

- Advertisement -

चीनमधील वयोवृद्धांना बुस्टर डोस नाही

चीनने झिरो कोविड पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गत नव्या कोरोनाबाधितांचा शोध घेतला जातो. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यात येते. चीनमध्ये आतापर्यत ९० टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु मोठ्या प्रमाणात वृद्धांना बुस्टर डोस देण्यात आला नाही. यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक राहिले आहे. तसेच चीनची कोरोना लस किती फायदेशीर आहे याबाबत अद्याप स्पष्टता मिळाली नाही.

मजबुरीने लोकं घरातच कैद

चीनमध्ये अनेक शहरांत लॉकडाऊन केल्यामुळे लोकांना घरातच राहावे लागत आहे. १.७ करोड लोकसंख्या असलेल्या शेनजेनमध्ये सांगण्यात आले आहे की, घरातील फक्त एकच सदस्य दोन किंवा ३ वेळा सामान आणण्यासाठी बाहेर जाऊ शकतो. मात्र स्थानिक लोकांनी याविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. ओमिक्रॉन सर्दीसारखा असल्यामुळे अनेक लोकं बरे झाले आहेत. तर आम्हाला कैद करुन का ठेवण्यात आले आहे. असा सवाल शेनजेनमधील पीटर यांनी केला आहे.


हेही वाचा : Earthquake in Japan: जपानमध्ये भूकंपाचे धक्के, चार जणांचा मृत्यू ; बुलेट ट्रेनही रुळावरून घसरली

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -