कोविड-१९ वार्डमध्ये आढळलेल्या ५ मांजरींचा मृत्यू

कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं आहे.

cats

देशभरात कोरोना विषाणूच्या कहरात केरळमध्ये ५ मांजरींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमधून ५ मांजरी पकडल्या होत्या. प्रशासनाने या मांजरींचे मुख्य अवयव तिरुअनंतपुरम येथे तपासणीसाठा पाठवले होते. अहवालात कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर म्हणतात की जेथे या मांजरी होत्या तेथे हवा नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. परंतु, पशुसंवर्धन विभागाने या मांजरींचे मुख्य अवयव सविस्तर तपासणीसाठी राज्य पशुवैद्यकीय केंद्र संस्थेकडे पाठवले आहेत.

पोस्टमार्टम डॉक्टर टिटो जोसेफ यांनी सांगितलं की, या मांजरी रुग्णालयाच्या कोविड -१९ प्रभागातून पकडल्या गेल्या आहेत. मृत्यूनंतर त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं. परंतु त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. ते म्हणतात की गरज पडल्यास त्यांचे नमुने चाचणीसाठी राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था, भोपाळ येथे देखील पाठवले जातील. या मांजरी कोविड प्रभागात घाण पसरवत होत्या. त्यानंतर त्यांना २८ मार्च रोजी पकडण्यात आलं. कासारगोड येथील अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये या मांजरींना ठेवण्यात आलं होतं. क्रेटमध्ये ठेवल्यानंतर दोन दिवसांनी मादी मांजरीचा मृत्यू झाला. नंतर, आणखी दोन मांजरी आणि मांजरीचे पिल्लू मरण पावले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


हेही वाचा – भारतात कोरोना पसरवण्याचा तबलीग जमातीचा कट; वसीम रिझवींचा आरोप


विभागात काम करणाऱ्या कामगारांनी पिंजर्‍यामध्ये ठेवून त्या मांजरींना दुध तसंच जेवण दिलं, असं थॉमस यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, मांजरींच्या मृत्यूसाठी ताणतणाव हे कारण असू शकतं. भटक्या मांजरी लगेचच पिंजर्‍यात आल्या. त्या पिंजर्‍यामधील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे तणाव त्यांच्या मृत्यूचे कारण असू शकतं. मात्र, आम्ही कोणताही धोका स्विकारु शकत नाही. म्हणूनच मांजरींच्या अंतर्गत अवयवांची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं जोसेफ म्हणाले. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे पशुसंवर्धन विभागातील साथीचा रोग विशेषज्ञ एम. जे. सेथुलक्ष्मी म्हणाले की या मांजरींमध्ये कोविड-१९ ची कोणतीही चिन्हे सापडली नाहीत. या मांजरींचा मृत्यू अशा वेळी घडला जेव्हा सरकारने देशातील प्राणिसंग्रहालयाला सतर्कतेचा इशारा दिला.