Bihar: बिहारमध्ये विषारी दारूमुळे ५ जणांचा मृत्यू तर ३ जणांची प्रकृती गंभीर

बिहारच्या राज्य सरकारकडून राज्यात दारूचे सेवन, उत्पादन आइ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा राज्यामध्ये दारूची तस्करी आणि दारूचे सेवन करण्याबाबत प्रकरणं दिवसागणिक समोर येत आहेत. परंतु आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे बिहारमध्ये विषारी दारूमुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नांदलामध्ये घडली आहे.

एकाचवेळी पाच जणांचा मृत्यू

नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छोटी पहाडी आणि पहाडीमधील तल्ली परिसरात एकाचवेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांचा प्रकृती अत्यंत गंभीर असून खासगी रूग्णालयात उपाचर घेत आहेत. दारू पिऊन तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईंकांकडून देण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. ठाणेध्यक्ष सुरेश प्रसाद यांच्यानंतर डीएसपी डॉ. शिब्ली नोमानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी या प्रकरणाची चाचपणी केली असता त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.

नक्की मृत्यू कशामुळे ?

दरम्यान, विषारी दारूचं प्राशन केल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. परंतु पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र जवळच्या परिसरात दारू बनवली जात असल्याचं येथील स्थानिक लोकं सांगत आहेत. तसेच मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगाव गावात दारू पिऊन दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

मागील वर्षातील ७ डिसेंबर रोजी समस्तीपूरच्या हाथोरी पोलीस स्टेशन हद्दीतील बल्लीपूर गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गावातील एका लग्न समारंभात सर्वांनी दारू प्यायली होती. मृत्युमुखी पडलेले तिघेही जणं कामगार वर्गातील होते. मात्र, पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळू नये, यासाठी कुटुंबीयांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले होते.


हेही वाचा : भुतानमध्ये चीनकडून करण्यात आलेल्या घुसखोरीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल