Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमधून ५ लाखांच्या नोटा लंपास

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमधून ५ लाखांच्या नोटा लंपास

हाय सिक्युरिटी परिसर असतानाही घडली घटना

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाखांच्या नोटांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्यंत उच्च सुरक्षा असलेल्या या नोटप्रेसमधून ही चोरी झाली कशी आणि या नोटा गेल्या कुठे, हा प्रश्न सर्वांनाच पडल्याने  याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, करन्सी नोट प्रेस व्यवस्थापनानेही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

देशभरातल्या नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या या नोटप्रेसमध्ये वर्षाकाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष किमतीच्या नोटा छापल्या जातात. देशात नोटबंदी जाहीर झाल्यानंतर याच कारखान्यात अहोरात्र छपाईचं काम सुरू होते. आता याच नोटप्रेसमध्ये चोरीचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पाच लाखांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी की त्या गहाळ झाल्या, असा सवाल उपस्थित होतोय. १२ फेब्रुवारीच्या या घटनेची तक्रार पोलिसांकडे आता करण्यात आल्यानं संबंधित अधिकार्‍यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -